Amalner

मतदार संघात कुठल्याही गलिच्छ राजकारणाऐवजी फक्त विकासाच्या राजकारणाला प्राधान्य -आ शिरीष चौधरी

मतदार संघात कुठल्याही गलिच्छ राजकारणाऐवजी फक्त विकासाच्या राजकारणाला प्राधान्य -आ शिरीष चौधरी

मतदार संघात कुठल्याही गलिच्छ राजकारणाऐवजी फक्त विकासाच्या राजकारणाला प्राधान्य -आ शिरीष चौधरी

दहिवद येथे महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात,तरुणाईच्या रेकॉर्डब्रेक मिरवणुकीने वेधले लक्ष
अमळनेर
अमळनेर मतदार संघात विकास आणि फक्त विकास हे एकच व्हीजन घेऊन आलो होतो. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आपल्या डोळ्यासमोर असून विकास करतांना कोणतेही राजकारण न करता केवळ विकासाला सर्वतोपरी प्राधान्य दिले.गलिच्छ राजकारणाला कधीही प्राधान्य दिले नाही, महात्मा फुलेच्या सामाजिक विचारानी हा महाराष्ट्र  घडला तेच विचार आजही  स्फूर्ती देतात.असे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी दहिवद येथे केले.
           दहिवद ता.अमळनेर येथे आ.चौधरींच्या कर्तृत्वातून निर्माण झालेले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या स्मारकाचे भव्य लोकार्पण आ.चौधरींच्या शुभहस्ते आणि हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी क्षत्रिय माळी समाज अध्यक्ष नीलकंठ  महाजन, अनिता  चौधरी, जिल्हा परिषद सदस्य मीना  पाटील, लोकनियुक्त सरपंच सुष्मा  देसले, उपसरपंच वैशाली माळी, प्रा. राजेंद्र महाजन, नगरसेवक सुरेश सोनवणे, भाऊसाहेब महाजन, पांडुरंग महाजन, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, किरण गोसावी, नाना महाजन, शिवाजी महाजन, भानुदास माळी, जगन्नाथ शेलकर, चेअरमन विकासो जीवन माळी, रवींद्र माळी, मालुबाई माळी, आशाबाई माळी, किरण माळी, सर्जेराव माळी, अनंता महाजन, हिरकनबाई माळी, भगवान वाघ, मच्छीद्र ट्रेलर, प्रवीण माळी, मनोज माळी, अनिल माळी, गोकुळ माळी, अनिल माळी, पंकज पाटील, रवींद्र माळी, रवींद्र शेलकर, भीमराव माळी, खंडेराव माळी,अनिल माळी, रवींद्र शेलकर, विकास शेलकर, भगवान माळी, रोशन सोनवणे, विपुल पाटील,चेतन माळी, आदिंची उपस्थिती होती.फुले दाम्पत्याच्या विचारांनी प्रेरित असलेल्या आमदार शिरीष चौधरी यांनी स्वखर्चातून दहिवद येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भव्य स्मारकाचे निर्माण केल्याने याचा लोकार्पण सोहळा हजारो समाज बांधव ग्रामस्थांच्या उपस्थितीत  पार पडला. अतिशय भव्य स्वागत आमदारांचे केल्यानंतर त्यांची जंगी स्वागत मिरवणूक काढण्यात आली,त्यानंतर आमदारांनी जनतेला संबोधित केले.
           आपल्या समाजप्रिय मनोगतात पुढे बोलताना आमदार चौधरी  म्हणाले की मतदार संघात या पंचवार्षिक कार्यकाळात विकासाचा आलेख उंचावला आहे.त्याचे वास्तव चित्र आपल्या समोर आहे,जलयुक्त शिवारामुळे पाणीटंचाई चा प्रश्न मिटला आहे.या मतदारसंघात विधानसभेसाठी बरेच नवख़्यानी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच योग्य उमेदवाराला संधी द्यावी तरच विकासाचा हा आलेच अधिक उंचावत राहील असे भावनिक आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी डॉ. रविंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन भानुदास माळी यांनी केले.

मतदार संघात कुठल्याही गलिच्छ राजकारणाऐवजी फक्त विकासाच्या राजकारणाला प्राधान्य -आ शिरीष चौधरी
अतिभव्य मिरवणुक ठरली लक्षवेधी
                 
        आमदार शिरीष चौधरी यांनी स्वखर्चाने स्मारक उभारून दिल्याने त्यांचे गावात येताच जंगी स्वागत करण्यात आले.गावातील तरुण व तरुणीनी भगवे फेटे धारण करीत लेझिम , झाज पथक यांच्यासह ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली.आतापर्यंत प्रत्येक गावात आ.चौधरींच्या भव्य मिरवणुका निघाल्या असताना हजारोंच्या सहभागामुळे येथील मिरवणूक रेकॉर्डब्रेक ठरली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button