Amalner

Amalner: सेलू येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी..न्हावी पंच मंडळाची निवेदनाद्वारे मागणी..

Amalner: सेलू येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी..न्हावी पंच मंडळाची निवेदनाद्वारे मागणी..

अमळनेर (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील सेलू येथील अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा
द्यावी अशी मागणी समस्त न्हावी पंच मंडळ अमळनेर यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सेलू जिल्हा परभणी येथील अल्पवयीन मुलगी वय वर्ष 11 व तिचा मावस भाऊ वय वर्षे दहा यांचे सेलू येथून अपहरण करून बोरी ( तालुका जिंतूर, जिल्हा परभणी) येथे दोन आणले व मुलाला कौसडी फाटा बोरी येथे सोडून मुलीला कोक शिवारात नेऊन लैंगिक अत्याचार करून पसार झाले. सदर घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे, तरी नाभिक समाजातील मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत समाज संतप्त झाला असल्याने सदर नराधमांवर पोक्सो कायदा व बाल लैंगिक प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी व्हावी तसेच या खटल्याकामी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करून पीडित कुटुंबास शासनाकडून ताबडतोब आर्थिक मदत मिळावी.अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष मधुकर सैंदाणे, सचिव सिताराम बोरसे, खजिनदार दिलीप सोनवणे उपाध्यक्ष आप्पा पगारे,सामाजिक कार्यकर्ते नंदू जगताप, गणेश पवार, महिला कार्याध्यक्ष उर्मिलाबाई दिलीप सोनवणे, सदस्य हर्षदा गणेश पवार, सुनिता दत्तात्रय कोंडे, शितल सिताराम बोरसे, रंजना दत्तात्रय सैंदाणे, विक्रांत
पाटील, दत्तात्रय रामभाऊ सैंदाणे, बाळासाहेब यादव बोरसे इसह समाजबांधव उपस्थित होते.
,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button