Maharashtra

लोकनियुक्त कारभारीच लयभारी दिलीयं ग्रामपंचायतीलाच हुलकारी गावकर्यांची सुरुय समश्यांबाबत ललकारी

लोकनियुक्त कारभारीच लयभारी दिलीयं ग्रामपंचायतीलाच हुलकारी गावकर्यांची सुरुय समश्यांबाबत ललकारी
कोट्यावधींचा जलस्वराज्य चा निधी खर्चुनही उभारलेला जलकुंभ पाण्याविना तहानलेलाच

लोकनियुक्त सरपंच यांनी ग्रामपंचायतीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मोठा वाघोद्यात समश्यांचा डोंगरच उभा राहिला आहे

प्रतिनिधी मुबारक तडवी

मोठा वाघोदा तालुका रावेर या लोकनियुक्त सरपंच सह १७ सदस्यिय ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी मोठा वाघोदा गावातील रहिवास सोडूनअकलूद(भुसावळ तापीकाठ) ता.यावल या गावात रहिवास केल्याने मोठा वाघोदा ग्रामपंचायतीला अनेक महिन्यांपासून फक्त मासिक बैठक व मासिक सरपंच मानधन घेणे वगळता सतत गैरहजर असल्यामुळे गावात सार्वजनिक पाणीपुरवठा, दिवाबत्ती, गटार सफाई घनकचरा स्वच्छतेअभावी नागरिकांना व ग्रामपंचायतीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ११महिन्यापासून लिपीक, पाणीपुरवठा, साफसफाई कर्मचारी, शिपाई आदिंचे पगार थकित झालेले आहेत महाशय लोकनियुक्त सरपंच यांनी ग्रामपंचायतीकडे पाठ फिरवल्याने १४वा वित्त आयोगाचा कोट्यावधींचा निधी धुळखात पडला आहे आता ऐन पावसाळ्यात गटारींची दुरावस्था झाली असून साधी डागडुजी सुध्दा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेली नाही अनेक खांबावरील पथदिवे बंद अवस्थेत च आहेत पावसाळ्यात साथ रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते त्याकरिता ग्रामपंचायतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सक्षम उपाययोजना व नियोजनबद्ध कार्य अपेक्षित आहे आणि मोठा वाघोदा गाव अगोदरच कोरोना प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेच मात्र यासह गावात एक ना अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे संपुर्ण गावास पिण्याचे पाणी सिंगनूर व बलवाडी या गावातील ट्युबवेलीद्वारे पुरवठा करण्यात येतो.मात्र लोकसंख्येच्या दृष्टीने मुबलकता नाही त्यामुळे गावात काहीशा वस्त्यांमध्ये पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते आहे त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे गावातील भरपुर पाणीसाठा असलेली शिल्लक ट्युबवेल वीज कनेक्शन अभावी बंद आहे तसेच जलस्वराज्य प्रकल्प योजनेंतर्गत गावास ७ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध झाला होता मात्र एवढा कोट्यावधींचा निधी खर्चुन उभारलेला महाकाय जलकुंभ पाण्याविना तहानलेलाच आहे.योजनेतील अनेक कामे अपुर्णा अवस्थेत आहे व जे झालेत तेही निकृष्ट दर्जाची केली आहेत त्यातच ग्रामपंचायतीस रामभरोसे सोडणारे लोकनियुक्त सरपंच यांनी ग्रामपंचायतीला मारलेली दांडी व केलेले दुर्लक्ष नियुक्त ग्रामविकास अधिकारी यांची घेतलेली व एक दोन दिवसाआड हजेरी देनारे ग्रामसेवक प्रभारी त्यास जोडीस जोड सरपंच लोकनियुक्त लयभारी त्याची ग्रामपंचायतीस हुलकारी गावककर्यांची समश्याविरोधी ललकारी सुरुच आहे मात्र गावचे प्रथम नागरिक यांनीच ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी आपल्या समश्यां मांडायच्या तरी कुणाकडे ? हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे तरी संबंधित वरिष्ठांनी लक्ष देवून तात्काळ दखल घेऊन उपाय योजना करावी अशी मागणी गावकर्यांतून होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button