Amalner: रणधुमाळी 2024: अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी १७ उमेदवारांचे अर्ज दाखल.. राष्ट्रीय पक्षाचे 3 तर इतर अपक्ष…
अमळनेर : विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून दि 29 ऑक्टो पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.काल अखेरपर्यंत अमळनेर विधानसभा मतदार संघात एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यात राष्ट्रीय पक्षांचे 3 उमेदवार 14 उमेदवार अपक्ष आहेत.उमेदवार दि ३० ऑक्टो रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली आहे.
अमळनेर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदे गट तर्फे अनिल भाईदास पाटील आणि जयश्री अनिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी तर्फे डॉ अनिल नथ्थु शिंदे ,बहुजन समाज पार्टी तर्फे सचिन अशोक बाविस्कर , तर अपक्ष उमेदवार म्हणून शिरीष हिरालाल चौधरी,अनिल भाईदास पाटील, शिवाजी दौलत पाटील, प्रा अशोक पवार , कैलास दयाराम पाटील , प्रतिभा रवींद्र पाटील , निंबा धुडकू पाटील , अमोल रमेश पाटील, प्रथमेश शिरीष चौधरी, संगीता प्रमोद पाटील, रतन भानु भिल, छबिलाल लालचंद भिल यांनी अर्ज दाखल केला आहे.तर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष तर्फे प्रदीप किरण पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. छाननी नंतर उमेदवारांचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून खऱ्या अर्थाने लढत ही तिरंगी होणार आहे.यात माजी आमदार शिरिषदादा चौधरी, अनिल पाटील आणि डॉ अनिल शिंदे यांच्यात ही तिरंगी लढत रंगणार आहे.






