Mumbai

?️ महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते माजी देवेंद्र फडणवीस यांनी पारधी कुटुंबाना खावटी वाटप करण्याची मागणी

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते माजी देवेंद्र फडणवीस यांनी पारधी कुटुंबाना खावटी वाटप करण्याची मागणी

मुंबई पी व्ही आंनद

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते माजी देवेंद्र फडणवीस यांनी पारधी कुटुंबाना खावटी वाटप करण्याची मागणी दि 25 एप्रिल, 2020 च्या पत्रा नुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
या मागणी पत्रासोबत माजी मंत्री डॉ. अशोक उईके यांचे पत्र पाठविले असून या पत्रात सद्यस्थितीत संपूर्ण देशभराकोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला असून त्यावर मात करण्याकरिता संपूर्ण राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित करण्या आलेला आहे.

अनुसूचित जमातीमधील आदिम जमातीला आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी वाट करण्यात येत आहे. तथापि पारधी समाजाला सद्यस्थितीत सर्वःत्र संचारबंदी असल्याने रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना पारधी पॅकेज अंतर्गत 3 महिन्याची खावटी विनामूल्य वाटप करण्याबाबत श्री उईके यांनी विनंती केली आहे.या परिस्थितीचा विचार करता या बाबीवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button