Chimur

खाकीतील माणुसकी…. विद्यार्थीनींचे रक्षक ठरले चिमूर पोलीस..

खाकी तील माणुसकी …विद्यार्थीनींचे रक्षक ठरले चिमूर पोलीस

चिमूर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

सद् रक्षणाय खलनिग्रहनाय है पोलिसांचे ब्रीदवाक्य खरच या ब्रीदवाक्या प्रमाणे पोलिस वागतात का?, याचा अनुभव नेहमी नागरिकांना वाईटच आला आहे, पोलिस हे कोणाशी ही प्रामाणिक वागत नाहीत, धड़ कधी कोणाशी बोलत नाहीत, हा अनुभव कधी ना कधी कुणाला आला असेलच,अत्याचार अन्याय होतो त्यावेळी सुद्धा पोलिस तपासात हयगय करीत असतात असे अनेक आरोप पोलिसांवर होत असतात.

परंतु काही घटना घड़ण्याआधी पोलिस आपले कर्तव्य निभावतात का? या प्रश्नाचे उत्तर हे होय आहे, कारण चिमूर पोलिसांनी असे काम केले की कौतुक करावे तितके कमीच आहे.
काही दिवसापूर्वी चंद्रपुर जिल्हा पोलिसांनी सारथी नावाची योजना सुरु केली, आणि सारथी योजनेत चिमूर पोलिसांनी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली, हरविलेल्या लहान मुलींना अवघ्या काही तासात शोधून देणे, हरविलेल्या युवतीला २४ तासाच्या आत शोधून आई वडीलांकडे सोपविणे अश्या विविध कामगिऱ्या चिमूर पोलिसांनी सारथी योजनेच्या माध्यमातून आपले कर्तव्य बजाविले आहे.

असेच एक कौतूकास्पद कार्य चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलिसांनी केले आहे. सध्या वर्ग १२ विच्या परीक्षा सुरु आहे, चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय येथे मासळ परिसरातील विद्यार्थिनी परीक्षा केन्द्रावर आल्या होत्या.पेपर सुटल्यावर त्या घरी जायला निघाल्या असता त्यांची बस काही आली नाही, बस न आल्याने सर्व मुली चिंताग्रस्त झाल्या, घरी जायच कस हा प्रश्न त्याना पड़ला होता, बस स्थानकावर ७ विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी बस मिळाली नाही असी माहिती चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे यांना मिळाली असता. त्यानी लगेच चिमूर बस स्थानकाकड़े धाव घेतली, विद्यार्थिनीची विचारपुस करून गाडीची व्यवस्था करुन दिली.
नायब पोलिस शिपाई किशोर बोढे, महिला पोलिस शिपाई उज्ज्वला निकुरे, मयूरी कोराम, उज्ज्वला परचाके पोलिस वाहक विजय उपरे यानी मासळ येथील पाच व बेलारा येथील दोन विद्यार्थिनींना स्वगृही सोडून दिले, मासळ व बेलारा येथील नागरिकांनी चिमूर पोलिसांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button