धनाजी नाना महाविद्यालयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया व अध्यापनासंबंधी सभा संपन्न
प्रतिनिधी सलीम पिंजारी
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, अध्ययन-अध्यापन सुविधा व भविष्यकाळातील शैक्षणिक उपाययोजना यावर ऑनलाइन सभा संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन सभा संपन्न झाली. यावेळी उपप्राचार्य डॉ उदय जगताप, उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे, आई क्यू ए सी सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते. या विचार-विनिमय सभेत उपप्राचार्य डॉ उदय जगताप यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संबंधी सविस्तर विवेचन करून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व प्राध्यापकांनी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी covid-19 च्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीवर भाष्य करताना सद्यस्थितीत ऑनलाईन सिस्टीम चा उपयोग करणे क्रमप्राप्त असल्याचे नमूद केले. याशिवाय महाविद्यालयातील सर्वच घटक या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन आय सी टी चा वापर करून अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रात कोणतीही कमतरता जाणवू देणार नाहीत अशी खात्री व्यक्त केली.
कोरोना महामारीच्या बिकट काळात तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूरचे अध्यक्ष मा श्री शिरीष दादा मधुकरराव चौधरी आणि सर्व सन्मा पदाधिकारी महोदयांनी महाविद्यालयात आय सी टी आधारित अध्ययन अध्यापनासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता करून देण्यात येईल व त्यामाध्यमातून प्राध्यापकांनी व्हिडीओ लेक्चरर्स तयार करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प्राध्यापकांनी शंकांचे निरसन करून घेत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या सद्यस्थितीत स्वतःची मानसिकता खंबीर ठेवत ज्ञानदानातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा मनोदय व्यक्त केला. सभेचे संचालन उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे यांनी केले.






