sawada

अॅगलो उर्दू हाय सावदा येथे तांदूळ वाटप. पण….घोळ कायम

अॅगलो उर्दू हाय सावदा येथे तांदूळ वाटप. पण….घोळ कायम

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

अॅगलो उर्दू हाय सावदा
ता रावेर जि जळगाव या शाळेत तांदूळ वाटप करण्यात आले आहे. या बाबत वहाटसप संदेश वरून सदरील बातमी प्रकाशित करण्यात येत आहे.
सदरील शाळेचे तांदूळ विक्री केले बाबत ठोस प्रहार मध्ये सलग बातमी प्रकाशित होत होती. व जागरूक नागरीक शेख फरीद शेख नुरोद्दिन यांचे तक्रार अर्जाचा
धचका घेऊन शाळेने घाई गरबडीत तांदूळ वाटप केले.
असे समजते.
ठोस प्रहार चे सावदा प्रतिनिधी युसूफ शाह यांनी आज दि. 20/04/2020 रोजी फोन वरून शाळा समिती चेअरमन शेख इकबाल शेख कादर व प्र.मुख्याध्यापक यांच्या शी संपर्क केले असता तांदूळ वाटपाची माहिती न देता उडवा उडवी ची उत्तरे दिली.व प्रती विद्यार्थ्यांना किती किलो तांदूळ दिले गेले आहे या बाबत अधिकृत माहिती मिळवलेली नाही.
तसेच गावातील पालकांशी विचारपुस केल्यावर मुलांना तीन ते साडेतीन किलो तांदूळ मिळाल्याचे सांगितले.
शाळेचे संबंधित कर्मचारी तांदूळ वाटपाची माहिती चे जाणिव पुर्वक लपवा लपवी करत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय पोषण आहाराचे तांदूळ वाटपाच्या मापात पाप.
➖➖➖➖➖➖➖➖➖

या आधीच अॅगलो उर्दू हाय सावदा तांदूळ विक्री चे एकी कडे प्रकरण गाजत आहे व त्या संबंधी शाळा प्रशासनाला समोर येऊन बचाव करावा लागत आहे. असे असतांना शाळेचे कर्मचारी यांनी तांदूळ वाटपाच्या मापात पाप केला आहे. या बाबत संबंधित अधिकारी चौकशी का करत नाही असे यक्ष प्रश्न निर्माण होतआहे. सदरील शाळेचे शालेय पोषण आहाराचे काम काज रावेर पंचायत समितीच्या अधिनिस्त येत असल्या ने
आता तरी संबंधित अधिकारी वर्गाने चौकशी करून या प्रकरणाला पुर्ण विराम दयावा अशी मांगणी सुज्ञ नागरीक करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button