Nashik

दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस

दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस

सुनिल घुमरे नाशिक

दिंडोरी तालुक्यात शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमार मुसळधार पाऊस पडल्यांमुळे तीसगाव धरणातील पाणीसाठा १००% भरले असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
तीसगाव धरणात पहिले ७१% पाणीसाठा होता मात्र या पाऊसाने हे धरण १००% भरले आहे त्यांमुळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे
पालखेड धरण ९७% भरले असून धरणातून ८७४ क्युसेस पाण्याचा विसंर्ग सोडण्यात आला आहे. तर पुणेगाव धरण ९६.२३ भरले असून या धरणातून लवकर विसंर्ग सोडण्यात येणार आहे . करंजवण धरण ८५.६६% भरले असून वाघाड धरण ८७.०७% तर ओझरखेंड धरण ७२.५८% भरले आहे.

दिंडोरी तालुक्यात शनिवारी सर्वाधिक पाऊस ननाशी परिसरात (१०९.० एम एम ) झाला आहे. तर वरखेडा विभागात(४६.० एम एम ), मोहाडी विभागात (४५.० एम एम), कोशिंबा विभागात(४३.० एम एम), वणी विभागात(३२.० एम एम), दिंडोरी विभागात(४३.०एम एम), तर उमराळे विभागात सर्वात कमी(७.० एम एम) इतका पाऊस झाला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button