Amalner

? प्रेरणादायी…तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांचा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्फत गौरव

तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांचा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्फत गौरव

रजनीकांत पाटील

अमळनेरचे तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडून त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आपल्या जीवाची व परिवाराची परवा न करता रात्रंदिवस काम करत तालुक्यातुन कोरोनाला हद्दपार करण्यास मोलाचे कार्य सुरू आहे. तहसीलदार वाघ यांनी तहसीलदार पदाची धुरा ही अमळनेर वरूनच सांभाळली या आधी ते धुळे तेथे ते नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. बढती होऊन थेट अमळनेर येथे बदली झाली. त्या नंतर मोठं मोठी आवाहनांना त्यांनी तोंड देत त्यावर विजय मिळवला. अमळनेर तालुक्यातील सर्वाधिक महसूल हा तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांच्या कार्यकाळातच जमा झाला. अवैध वाळू उपसा यांच्यावर जोरदार कार्यवाही देखील वाघ यांनी केली आहे. दिवसा आपले कार्यालयीन कर्तव्य आणि रात्री अवैध गौण खनिज करणाऱ्यांवर कार्यवाही असा अमळनेर तालुक्यासाठी संघर्ष तहसीलदार वाघ यांनी केला आहे. म्हणून असे गौरव त्यांच्या साठी त्यांच्या कामाचे खरे फळ आहेत. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे या बाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button