मन की बात युवाशक्तीसाठी प्रोत्साहन देणारा कार्यक्रम मा.ना.डॉ.भारतीताई पवार, आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री, भारत सरकार
दिंडोरी शहरात आयोजित मन की बात हा कार्यक्रम केंद्रीय *आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री माननीय नामदार डॉ भारतीताई पवार*यांच्या प्रमुख ऊपस्थितीत राजे बँक्वेट हॉल येथे नागरिक,विद्यार्थी, महीला, वृद्ध तसेच भारतीय जनता पदाधिकारी ,शक्तीकेंद्रप्रमुख व बुथप्रमुख व कार्यकर्त्यांच्या ऊपस्थितीत पार पडला.
ऊपस्थीत नागरिकांनी आदरणीय पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी दिलेल्या विविध विषयांवरील अभ्यासात्मक असे देशपातळीवरील संक्षिप्त विवरण व त्यातून भारतीय जनतेला प्रेरित करुन स्वयंसिद्धता, कार्यतत्परता, सांस्कृतिक वारसा,परस्पर सहकार्य, प्रतिकूल परिस्थितीतही कार्यरत रहाण्याची वृत्ती, संकट काळात खचून न जाता त्याचे संधीत रुपांतर करण्याची पात्रता, सुदृढ व सकस आहार, डिजीटल इंडीया च्या माध्यमातून स्वयंरोजगार व इंटरप्रीनरशीप , व्यवसायवृद्धी, नवीन संकल्पना मांडणे,युवकांना प्रेरणादायी विचार देणे या विषयांची अनुभूती घेतली.
याप्रसंगी व्यासपीठावर *संघटन सरचिटणीस डॉ सुनिलजी बच्छाव सर, शिवव्याख्याते श्री यशवंतराव गोसावी,तहसीलदार श्री पंकजजी पवार सो,पोलिस ऊपनिरीक्षक श्री.पांडुरंगजी कावळे सो, बी.डी.ओ. श्री शेवाळे,तालुका वैद्यकीय अधिकारी श्री मांडगे सर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिनजी दराडे, व्ही. जे.एन. टी. जिल्हाध्यक्ष रविंद्र गांगुली, तालुकाध्यक्ष नरेंद्रजी जाधव,मा.नगराध्यक्ष प्रमोदशेठ देशमुख, सरचिटणीस शामराव बोडके,योगेशजी तिडके,डॉ ऊमेश काळे,योगेश बर्डे,जेष्ठनेते चंद्रकांतजी राजे, नगरसेविका सौ.प्रज्ञाताई वाघमारे, सौ.आशाताई कराटे,सौ.अरुणाताई देशमुख, नगरसेवक श्री नितीन गांगुर्डे,शहराध्यक्ष शामराव मुरकुटे,युवामोर्चा तालुकाध्यक्ष श्री अमरसिंह राजे शहर सरचिटणीस निलेश गायकवाड, युवामोर्चा शहराध्यक्ष राम कराटे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष कैलासजी धात्रक ,व्हीजेएनटी तालुकाध्यक्ष धीरज चव्हाण,भास्करराव कराटे,रणजित देशमुख, काकासाहेब देशमुख, विलासनाना देशमुख, पिंगळे सर,तुषार घोरपडे,बाबुशेठ मणियार,अमोल खोडे,गणेश चव्हाण,काका वडजे,नित्यानंद जाधव,बाळु सोनवणे,सोमनाथ बस्ते,भास्कर गवळी, सोनवणे सर,नरेश चव्हाण, राकेश चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.
मन की बात कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर सुत्रसंचलन *श्री.तुषार वाघमारे यांनी केले.संघटन सरचिटणीस डॉ सुनील बच्छाव यांनी प्रास्ताविक करतांना *”मन की बात कार्यक्रम व त्याचा ऊद्देश व परिणाम आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. त्यानंतर शिवव्याख्याते श्री यशवंत गोसावीयांचे संक्षिप्त व्याख्यान झाले. त्यानंतर ऊपस्थितांना मार्गदर्शन करतांना आदरणीय केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांनी महत्वपूर्ण अशा कुपोषण निर्मुलन या विषयावर सोप्या भाषेत परिस्थितीजन्य ऊदाहरणासह कुपोषण मुक्ती साठी नवीन संकल्पना राबविणा-या अमृतसर येथील गावातील गावकरी,प्रशासन व अधिका-यांच्या एका मातेने दुसऱ्या मातेला कुपोषित मुलाच्या घ्यावयाच्या काळजीबद्दल सांगणे व मदत करणे हा ऊपक्रम असो,डिजिटल इंडिया चा ऊपयोग व्यवसाय यशस्वी होण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता साहसाने व परस्पर सहकार्याने त्यावर मात करण्यासाठी डख येथील सांस्कृतिक वारसा जपत शेतीकाम करण्याची पद्धत, डिजिटल प्लॅटफॉर्मची एका क्षणात सर्वदूर पोहचण्याच्या क्षमतेचा योग्य वापर,भारतातील ब्रेन पॉवर व मँन पॉवर चा यथोचित ऊपयोग, नवनवीन प्रेरणादायी घटना व कथांचा सारांश संकलीत करुन केवळ अर्ध्या तासात देशासमोर ठेवतांना पीएमओ कार्यालयाच्या कार्यपद्धती व सकारात्मक कार्यप्रणालीवर माहिती दिली.त्यांनी स्वतः कुठेही असलो तरीही मन की बात कार्यक्रम आवर्जून बघत असल्याचे सांगितले व ऊपस्थीत नागरिक व विशेषतः युवक व युवतींना हा कार्यक्रम न चूकता बघण्यास सांगितले. असेच एकदा मिझोरमला बॉर्डर एरीयात असतांना हा कार्यक्रम बघण्यासाठी एका स्थानिक कार्यकर्त्याच्या घरी गेलो असतांना तेथे पुर्ण गर्दी झालेली दिसली , कुतुहलाने त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की भारतात व जगात काय काम चालले आहे आणि कसे चाललेय हे आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजते तसेच आमच्या पैकीच अनेकजण विविध कामांतून यशस्वी होतात त्यांची सक्सेस स्टोरी यात दाखवतात त्याने आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्हाला पण वाटते की आम्ही पण असेच यश मिळवले तर एक दिवस पंतप्रधान आमच्या पण राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा ऊल्लेख करतील…हे ऐकून ताईंच्या मनात विचार आला की हा एक कार्यक्रम नसून एक ऊत्सव आहे जो काम करण्याचे… सर्वोत्कृष्ट काम करण्याचे स्पिरीट जनसामान्यांना देतो.तसेच त्यांंनी नवनवीन आयडिया, कल्पना या कार्यक्रमात मांडण्यात येतात तेव्हा ऊपस्थीत महिला, विद्यार्थी, युवक, युवतींना आग्रह केला की आपणही आपण करत असलेल्या ऊल्लेखनिय गोष्टींचा संक्षिप्त अहवाल व मन की बात बघतांनाचा एक फोटो पीएमओ कार्यालयास लिंकवरुन पाठवावा जेणेकरून त्या कामाची दखल घेतली जाईल. नवनवीन विषय, कल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचत असतात ते ही अभ्यासपूर्ण पद्धतीने व ही सर्व आदरणीय पंतप्रधानांची धडपड आपल्या पर्यंत सर्व क्षेत्रातील विषय पोहचवणे व आपणास प्रोत्साहित करणे यासाठी आहे. त्यांचे आभार मानतांनाच कमी वेळेत ऊत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल दिंडोरीच्या संयोजक टिमचे अभिनंदन केले. त्यानंतर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष श्री नरेंद्रजी जाधव यांनी केले व यापुढे तालुक्यातील युवकांना संधी देत नवनेतृत्व विकसित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत राहील असे सुतोवाच केले.
त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध ऊपक्रम राबविताना शासकिय आदेशानुसार विशेष परिश्रम घेऊन किल्ले रामशेज या ऐतिहासिक किल्ल्यावर आयोजित कार्यक्रम, तालुक्यातील राबविण्यात आलेले *हर घर तिरंगा अभियान, दिंडोरी शहरातील तिरंगा रैली व इतर ऊपक्रम ऊत्कृष्ट पद्धतीने नियोजन केल्याबद्दल दिंडोरी प्रशासन विशेष करुन *तहसीलदार पंकजजी पवार सो.पोलिस ऊपनिरीक्षक श्री कावळे सो, बी.डी.ओ.शेवाळे सो,ता.वैद्यकीय अधिकारी श्री. मांडगे सो यांचे विशेष अभिनंदन व सत्कार आदरणीय भारतीताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर ऊपस्थीत नागरिकांसोबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या व अनेकांनी मंत्रीमहोदयांना विविध विषयांवरचे निवेदने दिलीत. त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी मंत्रीमहोदयांनी निर्देश दिलेत.






