Faijpur

डॉ.गोपाळ कोल्हे यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता

डॉ.गोपाळ कोल्हे यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता

फैजपूर : सलीम पिंजारी

धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील विद्यार्थी विकास अधिकारी व व्यवसाय प्रशासन विभाग प्रमुख *प्रा. डॉ. गोपाळ गोरख कोल्हे* यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या मार्फत वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

डॉ.कोल्हे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत एम. फील. आणि पीएच. डी. च्या संशोधक विद्यार्थांना संशोधनासाठी मार्गदर्शन करू शकणार आहेत. डॉ.कोल्हे यांना १५ वर्ष पदवी व पदव्युत्तर तसेच व्यवस्थापन अभ्यास क्रमांना शिकवण्याचा अनुभव असून १२ वर्ष विद्यापीठ प्रशासनाचा अनुभव आहे. डॉ.कोल्हे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे व्यवसाय प्रशासन या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांची एकूण ३ पुस्तके प्रकाशित झाली असून १७ पेक्षा अधिक शोध निबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोध पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत त्या बद्दल तापी परिसर विद्या मंडळ याचे अध्यक्ष मा.आमदार श्री. शिरीषदादा चौधरी उपाध्यक्ष मा.डॉ. एस के चौधरी, सचिव मा. प्रा. एम.टी.फिरके तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर चौधरी व सर्व उपप्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button