भीमा कोरेगाव इतिहास..! 204 वर्षे पूर्ण..! 75 फुटी विजयस्तंभ शहिदांना मानवंदना..!
पुणे शहरापासून 20 किमी अतंरावर असलेल्या कोरेगाव या गावात दरवर्षी 1 जानेवारीला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो दलित अनुयायी येतात, निमित्त असते कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनाचे . यंदा कोरेगाव भीमाच्या शौर्यदिनाला203 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्याचा घेतलेला आढावा.
इतिहास काय सांगतो?
पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेल कोरेगावचे गाव . या गावात 1 जानेवारी 1818 या दिवशी कोरेगाव भीमाची लढाई झाली. या लढाईची इतिहासात पेशवे विरुद्ध इंग्रज अशी नोंद असली तरी तिचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. पेशव्यांच्या विरुद्धातील या युद्धात ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैन्यबळाचा वापर केला.ब्रिटीशानी पुकारलेल्या या युद्धात सहभागी होत असत या असताना महार सैनिकांचा उद्देश हा इंग्रजाना युद्ध जिंकून देण्यापेक्षा जाचक पेशवाईलाचाप बसवण्याचा मुख्य ऊद्देश होता,अशी माहिती इतिहासकार देतात.
या पेशवे विरुद्ध इंग्रज युद्धात पेशव्यांच्या सैन्यांची संख्या इग्रजांच्या सैन्यांच्या काहीपट जास्त होती. युद्धात पेशव्यांचे सैन्य हे हजारांच्या पटीत होते तर इंग्रजांचे सैन्य शेकड्यांच्या पटीत असलेले पाहायला मिळाल्याचे अभ्यासक सांगतात. मात्र इंग्रज सैन्यात असलेल्या महार रेजिमेंटमधील ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडीच्या’ सैन्याचा समावेश होता . पण युद्धात या तुकडीच्या सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांना मेटाकुटी आणल्याचेही सांगितले जाते.
पेशवे व इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढत असलेल्या महार रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांचा धुव्वा उडवला. अवघ्या 16 तासांमध्ये पेहशव्यांच्या सैन्याला जेरीस आणत पराभव पत्करण्यास भाग पडलं. या काही तासांच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्यानं आपली हार मानली. या युद्धात इंग्रजाचा विजय झाला म्हणजेच प्रामुख्याने महार रेजिमेंट जिंकली.
या युद्धात पेशव्यांच्या विरुद्ध महार रेजिमेंटच्या सैन्यांनी लढलेला समतेचा, हक्काच्या , न्यायाच्या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. युद्धात प्राणाची आहुती दिलेलया महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाची उभारणी करण्यात आली. या स्तंभावर युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकाची नावे कोरण्यात आली आहेत.
शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी आपल्या अनुयायांसह भेट देत मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो आंबेडकर दरवर्षी मोठ्या उत्साहाने भीमा कोरेगावला येतात.
‘One of the Triumphs of the British Army of the Earth’ असे लिहित ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारला त्यावर 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहेत.






