Rawer

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी संत साहित्य महत्वाचे — प्रा. महेंद्र सोनवणे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी संत साहित्य महत्वाचे — प्रा. महेंद्र सोनवणे

निंभोरा बुद्रुक ता.रावेर संदिप कोळी
सावदा येथील स्वामी नारायण गुरुकुल येथे आदरणीय श्री. भक्ती प्रसाद शास्त्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐनपूर महाविद्यालय येथील प्रा.श्री महेंद्र सोनवणे यांनी *संत वाडःमयात विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीबाबत संतांनी व्यक्त केलेले विचार* या विषयावर विद्यार्थ्यांना समजेल अशा साध्या व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. यात त्यांनी वेद, ऋषी, मुनी, साधू,संत या बाबतीतले संकेत सोप्या भाषेत सांगीतले. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, कान्होपात्रा यांच्या साहित्यातून चांगले जीवन आत्मज्ञानाने कसे जगता येईल याबाबत सखोल विचार मांडले. सर्व संतांनी हे विश्वची माझे घर ही बाब समाजाला पटवून दिली. प्रकृती, विकृती आणि संस्कृती म्हणजे काय असते याचे ही मार्गदर्शन केले. कारण यातून संस्कार घडत असतात.त्याचप्रमाणे सोनवणे सरांसोबत प्रा. अक्षय महाजन सर हे आमचे माजी विद्यार्थी होते त्यांनी या *शाळेत मी कसा घडलो* याबद्दल आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प.पु..स.गु.शा.भक्तिकिशोरदासजी, प.पु..स.गु.शा.अनंतप्रकाशदासजी, संस्थेचे संचालक श्री.पी. डी. पाटील सर, प्राचार्य श्री.संजय वाघूळदे सर, पर्यवेक्षिका सौ.अश्विनी चौधरी , सौ. माधूरी चौधरी मॅडम , (सी बी एस ई) समन्वयक श्री गिरीश नेमाडे सर , सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.निलेश बोरोले यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button