कवियित्री बहिणीबाईंचे तत्त्वज्ञान देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी प्रयत्नशील
खासदार उन्मेष पाटील यांचे प्रतिपादन
अपूर्ण स्मारक पूर्णत्वासाठी मुख्यमंत्र्यासोबत बैठकीसाठी पुढाकार घेणार
चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवन जगण्याचे तत्वज्ञान सर्व मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. हे तत्त्वज्ञान देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचण्यासाठी हे अहिराणी भाषेतील अनमोल ठेवा जगाच्या पाठीवर सर्वांना अनुभवता यावा या करिता सर्व भाषेमध्ये त्यांचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्नशिल राहून आसोद्यातील माहेरात स्मारकाचा रख़डलेला प्रश्न पूर्णत्वास नेण्यासाठी पालकमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांच्या
बैठकीचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेऊन लवकरच हा प्रश्न सोडविण्यांचे आश्वासन खासदार उन्मेश पाटील यांनी दिले. आज शनिवारी आसोदा
येथील बहिणाईच्या माहेरातील चौधरीवाड्यात बहिणाबाई जयंती निमित्त अायोजित अभिवादनासभेवेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जी.प. सदस्यपती रवींद्र देशमुख, पंचायत समितीच्या सदस्या सरला महाजन, पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी,ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. मिलिंद बागूल, स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर भाऊ चौधरी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की,
माणसातला माणुस घडविण्याचे काम बहिणाबाईच्या प्रत्येक शब्दातुन व्यक्त होते. स्मारकाच्या माध्यमातुन त्यांच्या कविता,
साहित्य अविरत रहावे यासाठी रखडलेले स्मारक व जिल्हा प्रशासनाने बदलेला आराखडा याबाबत विधानसभा आचारसंहिता पूर्वी मंत्रालय पातळीवर स्वतंत्र बैठक लावुन निधीसह आराखड्यानुसार स्मारक उभारणीकामी पाठपुरावा करण्यासह परिसरातील सिंचनासह पिण्याचे पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी आग्रही भुमिका घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. यासह बहिणाबाईच्या जीवनावर राज्याचे
मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात स्वतंत्र अंक प्रकाशित करण्यासाठी विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच नबाबाई बिर्हाडे, उपसरपंच अरूण कोळी, मिलींद चौधरी (भादली),
ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन, हेमंत पाटील, संजय बिर्हाडे, रविकांत चौधरी, ज्येष्ठ नागरिक चिंधु महाजन, दशरथ महाजन, दूधसंघाचे अध्यक्ष खेमचंद महाजन
यांच्यासह बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, उपाध्यक्ष प्रदीप भोळे, संजीव पाटील,सोनु चंद्रकांत कापसे, युवा सेनेचे सचिन चौधरी , जामदा सरपंच रवीआबा पाटील,अशोक भोळे,महेश भोळे
यांनी प्रतिमेचे पूजन केले. उपशिक्षक सचीन जंगले यांनी स्वयंरचित कविता सादर केली. प्रा. डॉ. मिलींद बागूल, ज्येष्ठ साहित्यीक कवी शिवलाल बारी यांनी बहिणाबाईच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी ते भावनाविवश झाले होते. स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार योगेश वाणी यांनी आभार मानले.
भाऊंचे फाऊंडेशनचे सचीन चौधरी, डॉ.रमाकांत कदम, भूषण सोनार, जितेंद्र नारखेडे, लोकेश महाजन, मिलींद नारखेडे, उमेश बाविस्कर विजय कोल्हे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.







