India

?Breaking News.. निर्भया बलात्कार  प्रकरण : पवनची याचिका न्यायालयाने फेटाळली!उद्या आहे फाशीची तारीख…

निर्भया बलात्कार प्रकरण : पवनची याचिका न्यायालयाने फेटाळली!

पटियाला

निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकावण्यासाठी उद्या दि.3 मार्च ही तारीख निश्चित केली आहे.

दरम्यान निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

पवननं आपल्या अर्जात घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. यापूर्वी त्याची रिव्ह्यू याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वमताने पवनची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली आहे.

ही कोर्टाने फेटाळली तरीदेखील दोषी पवनजवळ दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

न्या. एन व्ही रमन्ना, न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन फली नरीमन, न्या. आर भानुमती व न्या. अशोक भूषण यांनी हा निर्णय एकमताने दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button