Maharashtra

श्री दिगांबर चव्हाण प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नागपूर यांची मूळ पदावर बदली करुन सामाजिक अंकेशन (Social Aduit)नुसार चौकशी करा.

 नागपूर प्रतिनिधी 
 आदिवासी विद्यार्थी संघाचे आदिवासी विकास विभाग सहसचिव मा.सुनिल पाटिल यांना निवेदन.

श्री दिगांबर चव्हाण प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नागपूर यांची मूळ पदावर बदली करुन सामाजिक अंकेशन (Social Aduit)नुसार चौकशी करा.

 श्री दिगंबर चव्हाण यांची नियुक्ती गेल्या दोन वर्षापासून आदिवासी विकास विभाग नागपूर येथे प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे सदर लाभाच्या पदावर ते दोन वर्षापासून कार्यरत आहेत मुळात त्यांची या अगोदर  उपसंचालक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,औरंगाबाद येथे असताना त्यांना नागपूर येथे प्रकल्प अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली परंतु काही दिवस आगोदर पुन्हा त्यांची बदली मूळ पदावर औरंगाबाद येथे करण्यात आली परंतु राजकीय व आर्थिक आशीर्वादाच्या उपयोग करून त्यांनी मूळ पदावर रुजू होता पुन्हा आपल्या आर्थिक बळाचा वापर करून नागपूर येथे नियुक्ती करून घेतली.
     विशेष म्हणजे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती मध्ये एवढे महत्वाचे पद खाली असताना सुद्धा त्यांची त्या ठिकाणी झालेली नियुक्ती रद्द करून परत प्रकल्प अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आले नाट्यमय घडामोडी मुळे कुठेतरी संशयाचे वातावरण आमच्यासमोर  निर्माण होत आहे.
       श्री. चव्हाण यांचे विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे विशेष असे संबंध नाही प्रकल्प अधिकारी या पदावर राहणे म्हणजे संपूर्ण वस्तीगृहात, प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा अनुदानित आश्रम शाळा यांची पालकत्वाची जबाबदारी त्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची असते परंतु यापैकी काही दिसून न येता उलट विद्यार्थ्यांचे वार्तालाप दिसून येत नाही.
वस्तीगृह गृहपाल यांना आपल्या पदाचा धाक दाखवून पैसे उकळण्याची तक्रारी संघटनेत प्राप्त झाले आहेत त्याचबरोबर आदिवासी विकास विभागातील योजना आपल्या मर्जीतील व्यक्तीच्या साह्याने बळकवण्याचा प्रयत्न करतात.
      त्यांच्या दोन वर्षाच्या  कालावधीत प्रकल्प कार्यालयातील योजनांची तसेच त्यांच्या कार्यकाळात कारभाराची सामाजिक अंकेशन(Social Audit) सखोल चौकशी करावी  निवेदन देतांना आदिवासी विद्यार्थी विद्यार्थी संघटनेचे मंत्रालय मुंबई येथे आदिवासी विकास विभागाचे सहसचिव सुनिल पाटिल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष मुकेश नैताम, राहूल सिडाम, नरेश पेंदाम,गौरव गावडे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button