Aurangabad

आम्ही लेखिका, मायमराठी साहित्य परिषद व अक्षरसुक्त आयोजित महिला संमेलन संपन्न.

आम्ही लेखिका, मायमराठी साहित्य परिषद व अक्षरसुक्त आयोजित महिला संमेलन संपन्न.

आम्ही लेखिका, मायमराठी साहित्य परिषद व अक्षरसुक्त आयोजित महिला संमेलन संपन्न.

औरंगाबाद प्रतिनिधी
 २२ सप्टेंबर रविवार रोजी औरंगाबाद  येथे जीवन विकास वाचनालयाच्या सभागृहात महिला कविसंमेलन 
संपन्न झाले .अध्यक्ष स्थानी मोहन कुलकर्णी तर प्रमुख  पाहुण्या म्हणून रसिकाताई  देशमुख व मंजिरीताई कुलकर्णी होत्या.
मेघा पाटील व सुषमा म्हेसेकर यांनी गणेश वंदना व पसायदान म्हटले  
सुरवातीला केलेल्या प्रास्थापिकीय  भाषणात जिल्हाध्यक्ष माधुरी चौधरी यांनी संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट केली . माधुरी चौधरी यांनी सांगितले कि नवलेखिकांना आंतरराष्ष्ट्रीय 
व्यासपीठ मिळावे म्हणून या संस्थेची स्थापना झाली.माधवी देवळाणकर व मृणाल  देशपांडे यांनी घेतलेल्या  मुलाखतीत अध्यक्ष मोहन कुलकर्णी  म्हणाले 
कि …स्री लेखिकांना एकत्र आणून त्यांना एक स्वतंत्र व्यासपीठ  मिळावे यासाठी  आम्ही लेखिका  ची स्थापना झाली .आजपर्यंत  95 मराठी साहित्य संमेलन झाली पण फक्त 5महिलांना अध्यक्षपद मिळाले ही दरी कुठेतरी कमी व्हायला हवी .
तर लिहित्या व्हा असा संदेश रसिका ताईंनी दिला .नागपुरहुन आलेल्या विजया मारोतकर यांनी आपली फुलपाखरू कविता म्हणत म्हणत मार्गदर्शन केले

आम्ही लेखिका, मायमराठी साहित्य परिषद व अक्षरसुक्त आयोजित महिला संमेलन संपन्न.
त्यानंतर जेष्ठ साहित्यिकांना सन्मानित 
करण्यात आले .त्यात सुषमा म्हैसेकर ,अरुणा चौधरी ,अनुपमा मोघे, अलका कुलकर्णी ,रसिका देशमुख, पुराणिक,डाॅ निळेकर, माया महाजन,शुभांगी  देशमुख  
यांचा समावेश होता.
एक नवीन संकल्पना म्हणून नवीन पुस्तके आलेल्या 
लेखिकांचा सत्कार करण्यात आला .त्यात माधुरी चौधरी,मंगला चौरे,ज्योती सोनावणे,मानसी देशपांडे ,आशा 
डांगे ,निशा कापडे ,संध्याराणी कोल्हे ,यांचा पुस्तके देऊन  सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा कल्याणकर व मंगला 
चौरे यांनी केले .यानंतर झालेल्या 
कविसंमेलनात मंजुषा मुसाळे ,,चारूलता विसपुते, मानसी जोशी,गीतांजली शिंपी ,अलका कुलकर्णी, ज्योती सोनवणे,आशा डांगे,स्वाती  कुलकर्णी,,मृणालिनी कोकणगे,आरती दस्तुरे, सात्विका मराठे,वैशाली  कंकाळ ,ज्योती महाजन, लता बावणे, भारती सोळंके,मिनाक्षी  निळेकर,माया महाजन ,शुभांगी देशमुख, श्रध्दा भाले, विद्या उन्हाळे,, निशा कापडे,रेखा चव्हाण, शिवकन्या पुरी ,अनुपमा मोघे व कार्यकारीणी सदस्या नी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.
कन्यादिनानिमित्त आलेल्या कन्यकांचा औक्षण करून ,फुले उधळत, व पणती देऊन सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button