सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या..अरविंद सोनटक्के
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन.
शाळेतील 44 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग..
अमळनेर प्रतिनिधी
स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व समस्त महिलांना उजेडात वाट दाखवणा-या सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या.. असे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव तालुका अमळनेर येथे अध्यक्षीय भाषणातून जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के बोलत होते.
व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर महाजन ,स्काऊट शिक्षक एस.के.महाजन,
एच.ओ.माळी होते.
अगोदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
इयत्ता आठवीतील 12 विद्यार्थी इयत्ता नववीतील 18 विद्यार्थी इयत्ता दहावीतील 14 विद्यार्थी सहभाग नोंदवत असे एकूण 44 विद्यार्थ्यांनीं
वकृत्व स्पर्धेत भाग घेत सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला तर काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्यावर कविता ,ओव्या सादर केल्या.
वकृत्व स्पर्धेत पहिल्या पाच विद्यार्थ्यांना शाळेच्या एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविले जाणार आहे.
प्रथम-वैशाली पाटील
इयत्ता 10वी
द्वितीय-हर्षला पाटील
इयत्ता 9वी
तृतीय-जयश्री पाटील, वैष्णवी माळी,श्वेता बैसाणे(इयत्ता 8वी)
उत्तेजनार्थ-राजश्री पाटील इयत्ता 9 वी,
रजनी माळी,गायत्री पाटील, यशस्वी पाटील(इयत्ता 10 वी)
यशस्वी विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. व नंतर बक्षीस दिले जाणार आहे.
कार्यक्रमाला कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना शाळेचे शिक्षक एस.के महाजन यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार भावी पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे पूजन करा हीच खरी
जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल असे सांगितले.कार्यक्रमाचे आयोजक ईश्वर महाजन यांनी सुत्रसंचलन केले.तर कार्यक्रमाचे आभार एच.ओ.माळी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी एन.जी.देशमुख,संभाजी पाटील,यांनी सहकार्य केले.






