Maharashtra

नाविन्य संस्थेकडून बँकिंग सेवा देण्याचे प्रयत्न

नाविन्य संस्थेकडून बँकिंग सेवा देण्याचे प्रयत्न

कोल्हापूर -कागलप्रतिनिधी तुकाराम पाटील

कोरोनाच्या वाढत्या पप्रादुर्भावामुळे गावागातून जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत आहे.प्रत्येकजण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहे,तर अत्यावश्यक सेवा समजल्या गेलेल्या ठिकाणी सोशल डिस्टसिंग पाळली जात आहे,अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील ग्राहकांचा अल्पकाळात नाविन्य संस्थेने एक आधार देऊन आपली सेवा करत आहेत.त्यांच्या बांधिलकीच्या याच सेवेमुळे ग्रामीण भागातील लोकांचा चलनाचा तुटवडा कमी झाला असल्याचं जाणवत आहे.
ग्रामीण भागातील जनतेचे बऱ्याचशा शासकीय योजनांसाठी राष्ट्रीयकृत बँकेतच खाती असल्याचे दिसून येते या सगळ्या लॉक डाऊन च्या काळात नाविन्य संस्था आणि बँक यांचे असणार नाते घरपोच सेवा देऊन अधिक दृढ करण्याची भूमिका बजावत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या लॉक डाऊन च्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून राष्ट्रीयकृत बँका सुरू आहेत मात्र संचारबंदी मुळे या बँकांमध्ये जाण्यास ग्राहकांना अडचणी येत आहेत याचाच विचार करीत अल्पमानध तत्वावर नाविन्य संस्थचे प्रतिनिधी शासनाच्या आदेशाच्या पालन करीत गावागावात जाऊन सेवा देण्याचे काम बजावत आहेत या सगळ्यामुळेच ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक अडचण जाणवत नसल्याचे आणि चांगली सेवा मिळत असल्यानं समाधान व्यक्त करताना दिसत आहे .अधिक माहिती करिता नाविन्य बहुउउद्देशीय संस्था कार्यालय सरपीराजी रोड मुरगुड ता.कागल जि.कोल्हापूर मोबा. नंबर9004139677 येथे सम्पर्क साधावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button