महावितरणचे ब्रीद वाक्य सेवा सुरू ठेवणे नफा नाही – कुमठेकर… जानोरीत कृषी धोरण २०२० बाबत संवाद सभा
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
जानोरी – शेतकऱ्यांना वीज देण हे आमच कर्तव्यच परंतु शेतकरी व वीज वितरण कंपनी या दोघांनाही नुकसानीपासून वाचवायचे असेल तर त्यात समतोल साधने आवश्यक असून त्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करणे अपेक्षित असून महावितरणचे ब्रीद वाक्य सेवा क्रणेव सुरळीत चालू ठेवणे आहे नफा गीरी नाही असे प्रतिपादन वोज वितरणचे नाशिक परिमंडळचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले.
आज दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे शासनाच्या कृषी धोरण २०२० च्या निमित्ताने मार्गदर्शनपर संवाद सभा आयोजित केलेली होती यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नाशिक मंडळ अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, नाशिक ग्रामीण कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, उपकार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील, मा. जि.प. सदस्य शंकरराव काठे, मा. जि.प. अध्यक्ष दिगंबर गीते, शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, सुरेश कळमकर, तुकाराम जोंधळे, सागर गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, विलास पाटील आदि होते यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना परिमंडळचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर बोलत होते ते पुढे म्हणाले की खाजगीकरण कोणालाही नको आहे त्यासाठी वीज वितरण कंपनीच्या आव्हा हा नाला प्रतिसाद देणे आवश्यक आहे तसेच लोडशेडिंगचे समीकरण उपस्थितांना समजून सांगितले त्याच बरोबर वीज चोरी थांबविन्याबरोबरच शेतकऱ्यांनी कृषी धोरण २०२० मध्ये सहभागी होऊन वीज बिल भरण्यासाठी सहमती दर्शवून संवाद कार्यक्रमाच्या वेळी दहा लाख पन्नास हजार रुपयांची थकबाकी भरली त्याबद्दल अभिंनदन करून हि चळवळ अविरत अशीच चालू ठेवण्यासाठी आव्हाहन केले. यावेळी शेतकऱ्यांची संवाद साधून त्याच्या अडचणी व मनोगत एकूण घेतले त्यात प्रामुख्याने ग्राहकांच्या वतीने शंकरराव वाघ, डी.बी. काठे, रामराव डवणे, बाबुशेठ बागमार, ज्ञानेश्वर डवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना रीडिंग नुसार बिलाची आकारणी करणे, मागेल त्याला मीटर देणे, काही शेतकऱ्यांकडे ३ अश्वशक्तीचे पंप असतांना ५ अश्वशक्तीचे (HP) बिल आकारले जाते त्यात सुधारणा करून सुधारित बिल आकारणी करणे या सारख्या मागण्या केल्याअसता कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी ते मान्य करून त्यात सुधारणा व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नाशिक मंडळ अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, नाशिक ग्रामीण कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदशन करतांना कृषी धोरण २०२० ची माहिती दिली महावितरण कर्मचारी २४ तास ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध असून ग्राहकांच्या सर्व सेवा देण्यासाठी तो कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी वीज भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे असे आव्हान करून वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज पूरवठा खंडित करण्यात येईल अशीही कल्पना दिली तसेच अडचणीच्या काळात वीज वितरण कंपनीला सहकार्य करून उभारी देण्यासाठी मदत करावी असेही आव्हाहन केले.
यावेळी प्रवीण नाना जाधव, धनंजय वानले, गणेश वाघ, गुलाब घुमरे, पुंडलिक कळमकर, मधुकर गायकवाड, चंद्रभान गणोरे, बुराव जाधव, शिवाजी सानप, बाळासाहेब महाले, सिताबाई मंडलिक, निवृत्ती जोंधळे, रामनाथ नाठे, दत्तात्रेय काठे आदि शेतकऱ्यांनी या कृषी धोरनेत सहभागी होऊन १००% थकबाकी जमा करून दहा लाख पन्नास हजार रुपये जमा करून थकबाकी भरण्यास सुरवात केली त्याबद्दल सर्वांचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विलास अण्णा पाटील सुरेश मामा कळमकर बाबु शेठ बागमर सतीश घुमरे पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी सहाय्यक अभियंता विशाल मोरे, सहाय्यक अभियंता मनोज कातकाडे, सहाय्यक अभियंता सुवर्णा मोरे, संजय धनाईत, सिद्धार्थ बनकर, गोपीनाथ वाघ, निवृत्ती जोंधळे, अविनाश ठाकरे, मंगेश सांगळे, दिनेश काठे, जगदीश गायकवाड, राहुल रोंगटे व ओझर उपविभाग अंतर्गत सर्व अधिकारी व वीज कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी केले तर आभार सहाय्यक अभियंता रंजना करसाळे यांनी मानले.






