Amalner

?️अमळनेर कट्टा..जुगाराचे दोन अड्डे उध्वस्त..!स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अमळनेरात कार्यवाही…

?️अमळनेर कट्टा..जुगाराचे दोन अड्डे उध्वस्त..!स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अमळनेरात कार्यवाही…

अमळनेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अमळनेर येथील बाहेरपूरा भागात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकत कार्यवाही केली आहे. यात अमळनेर पोलिसांचे देखील सहकार्य लाभले.या संयुक्त कारवाईत जुगार्‍यांसह बुकींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अमळनेर शहरात जुगार चालत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. या अनुषंगाने एलसीबीसह अमळनेर पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. या पथकात एलसीबीचे हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, सुनील दामोदरे, प्रमोद वंजारी, भारत पाटील तसेच अमळनेर पोलीस स्थानकाचे दीपक माळी, डॉ. शरद पाटील व रवींद्र पाटील यांचा समावेश होता.

पोलिसांच्या या पथकाला बाहेरपुरा भागात कमीलखा लहूखा पठाण ह्याच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता त्याच्याजवळून ४ हजार ५५० रुपये व सट्टा, जुगाराची इतर साधने जप्त करण्यात आली आहेत. यासोबत जुगार अड्डयाचा मालक रहिम छोटू बागवान सह गुलाब नथ्थू पाटील, प्रल्हाद संतोष पाटील उर्फ न्हानभाऊ (रा. पैलाड) यांना ताब्यात घेण्यात आले.

याचबरोबर पोलिसांनी चिंत्या चौकात छापा टाकून किशोर गुलाबराव पाटील ला जुगार खेळताना अटक केली. त्याच्या जवळून १ हजार १६० रुपये आणि जुगाराचे इतर साधने जप्त केली आहेत..वरील पाचही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button