Jalgaon

?जळगांव Live… वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आधुनिक सावित्रीचा पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न..!अंगावर ओतले रॉकेल..!

?जळगांव Live… वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आधुनिक सावित्रीचा पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न..!अंगावर ओतले रॉकेल..!

जळगाव आज वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षांपासून दारूच्या व्यसनामुळे होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आज महिलेने रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जळगावातील मेहरूण परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की उज्वला पाटील (लाडवंजारी) रा.संतज्ञानेश्वर चौक, मेहरून ,जळगाव येथे आपल्या दोन मुलांसह राहतात. पती संजय पाटील याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आज उज्वला पाटील यांनी सायंकाळी 7:20 वाजेच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात त्या 70 टक्के भाजल्या गेल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना CMO डॉ कळसकर यांनी गोदावरी मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी पाठविल्याचे सांगितले. यावेळी परिसरातील नगरसेवक प्रशांत नाईक व कार्यकर्त्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उज्वला पाटील यांना मुलगी नेहा व मुलगा विशाल असे मुले आहेत मात्र मोठा मुलगा अक्षय संजय पाटील (लाडवंजारी) याने दोन वर्षांपूर्वी राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान उज्वला पाटील यांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत नोद करण्याचे काम सुरु होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button