Amalner

अमळनेर:सरपंचासह 11 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल… लोण खु गावात तणाव पूर्ण शांतता…

अमळनेर:सरपंचासह 11 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल… लोण खु गावात तणाव पूर्ण शांतता…

अमळनेर येथील लोण खुर्दच्या सरपंचाने ग्रामपंचायती जागेवर अतिक्रमण करून जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला प्रकरणी तक्रार केल्या मुळे हाणामारी करत बदला घेण्याचा गुन्हा घडला आहे.या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की गावातील जमीन आपल्या पदाचा गैरवापर करत हडप करण्याचा प्रयत्न केला यामुळे त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली याचा राग येऊन तक्रार करणाऱ्यास चौघांवर अकरा जणांनी जीवघेणा हल्ला दि 18 नोव्हेंबर रोजी करून करीत दंगल घडवून आणली. यात लोखंडी सळई, दगड, लाठ्या काठ्यांचा वापर करीत मारहाण करीत गावात दहशत निर्माण केली.यामुळे गावाची शांतता भंगून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फियदिी समाधान शिंदे रा. लोण खु. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी राहत्या घरी विकास शिंदे, बापू पाटील, साधना पाटील, महेंद्र शिंदे, निलेश शिंदे, चूनीलाल पाटील, बापू पाटील, आदित्य पाटील, संदीप पाटील, सुशिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी येऊन लाकडी काठ्या व लोखंडी सळईने फिर्यादी व त्याच्या घरच्या लोकांना मारहाण केली. ह्या मारहाणीत फिर्यादीचे वडील
गुलाबराव पाटील यांना लोखंडी सळई ने मारत दात पाडला तर पाठीवर बुक्क्यांनी मारहाण करत डोके फोडले. फिर्यादीला चापट बुक्क्यांनी मारहाण केली तर चुलत आजीला चापट बुक्क्यांनी मारहाण करत साडी फाडली असून अकरा जणांविरुद्ध मारवड पोलिसात भादवि कलम 143,147,149, 452, 326, 323, 504, 506, 427 अन्वये तसेच म.पो. अधि. कलम 371,3 चे उल्लंघन केल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे कॉ. भटूसिंग तोमर करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button