Amalner

Amalner: महिला हाउसिंग ट्रस्ट तर्फे पर्यावरणदिनानिमित वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रम संपन्न

Amalner: महिला हाउसिंग ट्रस्ट तर्फे पर्यावरणदिनानिमित वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रम संपन्न

अमळनेर महिला हाऊसिंग ट्रस्टतर्फे पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण आणि
जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिला हाऊसिंग ट्रस्ट गेल्या 28 वर्षापासून कार्यरतअसून त्यांचे नऊ राज्यात काम सुरू आहे.

अमळनेरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहे. महिला हाऊसिंगच्या मदतीने शहरातील स्लम भागातील महिलांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले. तसेच सुका आणि ओला कचरा विलगीकरण, पाण्याचे महत्व पटवून दिले. अंबर ऋषी टेकडीववरील जल शुद्धीकरण केंद्र सोलरराईस करून त्यांची भेट घेत महत्व जाणून घेतले. तसेच जनजागृती करण्यात आली. यासाठी ट्रस्टच्या प्रकल्प व्यवस्थापक भारती भोसले, समन्वयक योगिता मालुसरे यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने आशा पाटील, गीता पोतले, स्मिता कोचळे, भारती दाभाडे, संध्या मराठे, दिपाली भोईटे, रूपाली सोनवणे, भारती सोनवणे, रूपाली शिंदे, रूपाली लाड, मानसी संदानशिव, ललिता वायकर, मोहिनी सोनवणे, संगीता बारस्कर, देवयानी पवार, जयश्री चौधरी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button