Nashik

आदिवासी विकासचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या राहत्या घरातून ९८ लाख ६३ हजार रुपयांची दिनेशकुमार बागुल यांच्या घरात सापडली इतकी “माया”

आदिवासी विकासचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या राहत्या घरातून ९८ लाख ६३ हजार रुपयांची रोकड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला सापडली २८ लाखांची लाच घेणाऱ्या दिनेशकुमार बागुल यांच्या घरात सापडली इतकी “माया”

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक -:आदिवासी विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्यांच्या नाशिकच्या घरातून 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरी 45 लाख 40 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणांहून 1 कोटी 44 लाखांची रोकड सापडली असून काही महत्वाचे दस्त ऐवज देखील हाती लागले असल्याची माहिती सूत्रानी दिली.

शिवाय अद्यापही बागूल यांच्या अनेक घरांत झाडाझडती सुरु असून पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला जात असल्याचे समजते आहे. २८.८० लाख रुपये लाच घेताना आदीवासी विभाग बांधकाम अभियंता यांच्या कडे बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे नाशिक, पुणे,या दोन्ही ठिकाणी महत्त्वाचे कागदपत्र हाती घेण्यात आले आहे शुक्रवारी दिनांक २६ रोजी न्यायालयाने रविवार पर्यंत तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.आश्रमशाळेच्या सेंट्रल किचन टेंडर चा कार्यारंभ आदेश देण्यासाठी ठेकेदाराकडुन बारा टक्के दराने कमिशन पोटी २८.८० लाख रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने नयनतारा सिटी येथे अटक केली आदीवासी आश्रमशाळा हरसुल येथे आर के इन्फा कान्स्टो प्रा ली कंपनी चे किचन सेन्ट्रल चे दोन कोटी चाळीस लाख रुपये किंमतीची टेंडर आॅनलाईन भरले होते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला टेंडर मिळाले होते त्याचा कार्यरऺभ आदेश देण्यासाठी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी २८ .८० रुपये कमिशन ची मागणी केली होती.सबधीत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग पंधरा दिवस सापळा रचत बागुल यांच्या निवासस्थानी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे पथकाचे अधिक्षक सुनील कडासने,अप्पर अधीक्षक नारायण न्याहळदे ,उपअधिक्षक सतिश भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव,अजय गरुड, नितीन कराड, संतोष गांगुर्डे यांनी कारवाई केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button