Jalgaon

Jalgaon Live: गाईच्या शेणापासून गणपती मूर्ती साकार..!गो शाळेचा अनोखा उपक्रम..!

Jalgaon Live: गाईच्या शेणापासून गणपती मूर्ती साकार..!गो शाळेचा अनोखा उपक्रम..!

जळगावात (Jalgaon News) एका गो शाळेत चक्क गाईच्या शेणापासून गणपती मूर्तीची निर्मीती करण्यात येत आहे. या मूर्तींना मोठी मागणी सुद्धा असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे पूर्णपणे नैसर्गिक संसाधन म्हणजे शेणापासून ही मूर्ती बनविलेली आहे. तसेच या मूर्तीसाठी वापरलेले रंगसुध्दा नैसर्गिक असल्याने पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.
गायीचे शेण आणि गोमूत्र याचे पावित्र आपल्याला माहित आहेत. त्याचप्रमाणे शेणापासून बनविलेल्या या मूर्तीचं आध्यात्मिक, वैज्ञानिकदृष्या अन्यन्य साधारण महत्व आहे. गायीपासून मिळणाऱ्या गोमूत्र तसेच शेणाचा वापर केला तर घरात सात्विकता येते असे या शेणाच्या मूर्तीचे आध्यात्मिक महत्त्व आहे. शेणाच पावित्रं महत्व लक्षात घेवून एरंडोल शहरालगत असलेल्या समर्पण गोशाळा गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेणापासून गणपती मूर्ती बनविण्याचा उपक्रम राबवित असल्याच पहायला मिळत आहे. योगेश पाटील त्यांचे बंधू रवी पाटील व त्यांचे कुटुंबिय समर्पण गो-शाळा चालवित आहेत. गोशाळेत तब्बल 60 पेक्षा अधिक गायी आहेत. त्यांच्या चारा पाण्याचा खर्च निघावा यासाठी गोशाळेतील गायीच्या शेणापासून मूर्ती बनविण्याची कल्पना योगेश पाटील यांना सुचली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button