Amalner

आणि…स्वातंत्र्य दिनी उंच गगनी फडकला तिरंगा….

आणि…स्वातंत्र्य दिनी उंच गगनी फडकला तिरंगा….

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा पाठपुरावा…तिरंगा चौकात 100 फुटी तिरंगा फडकला..नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे नेहमी अग्रेसर असतात.त्यांच्या ह्या उत्तम कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अमळनेर शहरात नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी तिरंगा चौकात आमदारांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने १००.३ फूट स्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले.

लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, उपनगराध्यक्ष विनोद लंबोळे, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.

तसेच या वेळी तालुकयातील राजकीय ,सामाजिक ,पत्रकार ,व प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते. ३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला. अनेकांनी या राष्ट्रीय सोहळ्याचा आनंद घेतला.अमळनेर करांना अत्यन्त अभिमानास्पद अशी ही बाब असून आज सर्वांनीच अभिमानाने हा सोहळा अनुभवला…

संबंधित लेख

Back to top button