Amalner

?️ अमळनेर कट्टा… DS 24 जिम तर्फे योगा दिन उत्साहात साजरा

?️ अमळनेर कट्टा… DS 24 तर्फे योगा दिन उत्साहात साजरा …

अमळनेर : अमळनेरात नव्यानेच सुरू झालेल्या DS 24 FITNESS CENTER तर्फे आंतरराष्ट्रीय योगादिवस उत्साहात साजरा करण्यात आला . अमळनेरकरांसाठी नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक DS 24 जिमच्या वतीने या कार्यक्रमात आरोग्याचे महत्व विशद करण्यात आले . योगातज्ञ जयश्री पाटील यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिके करवून घेत , योग दिनाचं महत्त्व स्पष्ट केलं . योगा कार्यक्रमाचं उदघाटन न.प. अमळनेरचे उपमुख्याधिकारी श्री. संदीप गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले . उदघाटक संदीप गायकवाड यांचा सत्कार DS 24 चे संचालक धिरज विजय पाटील व शुभम मुरलीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी गायकवाड यांनी मनोगतात , आयुष्यात सकारात्मकता व उर्जा टिकवण्यासाठी आरोग्य जपणे महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवावक्ता सारांश धनंजय सोनार यांनी केले . व्यायाम व आहार तज्ञ हिमालय हिंदुजा , राजश्री पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं .या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे , सौ. वर्षा गायकवाड , सौ.सौरिता पाटील , मुरलीधर पाटील , व्ही.डी. पाटील यांची विशेष उपस्थिती होती . हेमंदीप चौधरी , उदय महाजन , भूषण चौधरी , आकाश चौधरी , तेजस पाटील , मयूर पाटील , नंदकिशोर बाविस्कर , मयूर हिंदुजा यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले .या अत्याधुनिक जिमचा अमळनेरकरांनी अधिकाधिक लाभ घेऊन आरोग्याची कास धरावी , असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button