?जळगांव Live…आणि आमदारांनी बांधले चक्क अधिकाऱ्याला खुर्चीला..!विजबिला संदर्भात झाला गदारोळ..!आ मंगेश चव्हाण यांच्यावर 353 दाखल..
जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह महावितरण अधिक्षक अभियंत्यास धक्काबुक्की करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रकार आज दुपारी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा भा.द.वि. 353, 332, 143, 147, 149, 351, 294, 269, 188, मुंबई पोलिस कायदा कलम 135 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक वृत्त असे की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगार,शेतकरी, लहान उद्योजक सर्व साधारण माणूस हैराण झाला आहे.त्यातच रोजगार बंद असल्याने सामान्य माणसाची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. या सर्व बिकट परिस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वसुलीचा जोर सुटला आहे.गोर गरीब जनतेचा कुणी वाली राहिला नाही.अश्या परिस्थितीत आ मंगेश चव्हाण हे महावितरण कार्यालयात गेले व त्यांनी सदर अभियंत्यास जाब विचारला आणि त्या अभियंत्यास खुर्चीत बांधले.
याबाबतीत महावितरण अधिक्षक अभियंता मोहम्मद फारुख मोहम्मद युसुफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आ. मंगेश चव्हाण व त्यांचे जवळपास पन्नास समर्थक त्यांना भेटण्यासाठी एमआयडीसी परिसरातील कार्यालयात आले होते. त्यावेळी एकेरी भाषेत बोलून हा धक्काबुक्कीसह अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.






