Maharashtra

पारोळ्यात ‘महावितरण’चा भोंगळ कारभार! अव्वाच्या सव्वा विजबिलांमुळे नागरिक संतप्त…

पारोळ्यात ‘महावितरण’चा भोंगळ कारभार!
अव्वाच्या सव्वा विजबिलांमुळे नागरिक संतप्त

पारोळ्यात 'महावितरण'चा भोंगळ कारभार! अव्वाच्या सव्वा विजबिलांमुळे नागरिक संतप्त...

पारोळा: प्रतिनिधी देविदास चौधरी शहरातील महावितरण विभागाचा भोंगळ कारभार सुरू असल्याने अव्वाच्यासव्वा बिले नागरिकांना येत आहेत. परिणामी नागरिकांनी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.  
‘शहराच्या बहुतांशी भागात अनेक नागरिकांना अव्वाच्यासव्वा बिले अदा झाली आहेत.परिणामी नागरिक जेरीस आले आहेत. महावितरण विभागाविषयी जनमानसात संतापाची लाट आली आहे. ज्या नागरिकांना हजार रुपयांच्या आत बिल अदा होत होती, त्यांना तब्बल तीन तीन हजारच्या वर बिले प्राप्त झाली आहेत. काही वीज ग्राहकांना तर दहा हजार रुपयापर्यंत बिले प्राप्त झाली असल्याने नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला आहे.
ज्या नागरिकांना अवाजवी बिले प्राप्त झाली आहेत, त्यांना महावितरण विभागात पायपीट करावी लागत आहे. मात्र तेथेही त्यांचे समाधान होईल याची खात्री नसते. कारण त्यांच्या नियमानुसार जर मीटर तेवढे फिरले असेल, तर ते बिल कितीही असो; ते ग्राहकाला भरावे लागेल. असा महावितरणचा अलिखित नियमाचा घोषा तेथे वाजविला जातो. मात्र नागरिकांनी कितीही पोटतिडकीने सांगितले, आम्हाला तिप्पट पट जास्तीचे  बिल प्राप्त झाली आहेत, तरी त्यांचे काही एकूण न घेता त्यांच्याच म्हणणे ते अधिकारी कर्मचारी मिरवतात, असे नागरिकांनी बोलून दाखविले.
+’महावितरण’वर आक्रोश मोर्चा–
iएरवी येणाऱ्या बिलाच्या तिप्पट पट बिले या महिन्यात नागरिकांना प्राप्त झाल्याने नागरिकांनी, महिलांनी संताप व्यक्त करीत महावितरण कार्यलय गाठले, अन शंभर रुपये रोजंदारीने कामाला जायचे अन एवढं बिल कुठून भरायचे.? असा संतप्त सवाल महावितरणला केला. शहरातील विविध भागांतील नागरिक, महिला एकवटले अन अवाजवी येणाऱ्या बिला विषयी संताप व्यक्त करीत अधिकाऱ्यांना खडेबोल त्यांनी सुनावले.
‘स्मार्ट मीटर बनले चिट मीटर..?
॥महावितरण तर्फे नव्याने बसविण्यात आलेले मीटर हे पारदर्शी असल्याचे सांगण्यात येते. त्यात वीज चोरी थांबणार, येथील क्रिया मुबंईच्या अधिकाऱ्यांना कळणार, रिडींग एका ठिकाणावरून घेता येणार अश्या विविध बाबींनी मीटर कसे स्मार्ट आहे असे दाखविण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात या मिटरद्वारे रीडिंगची महत्वाची प्रक्रियाच नीट होत नसेल तर त्याला कसले स्मार्ट म्हणायचे? त्यामुळे अवाजवी बिले प्राप्त होत असल्याने “स्मार्ट नव्हे, चिट मीटर” अश्या प्रतिक्रिया जनमानसातुन उमटत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button