प्रतिनिधी- आनंद काळे
श्री.बापूराव काळे,समाजसेवक आदिवासी पारधी समाज
बारामती-बारामती तालुक्यामध्ये आदिवासी पारधी समाज्याची लोकसंख्या जास्त आहे.देशात कोरोना संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक पारधीकुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे,असे पारधीसामाज्याचे समाजसेवक श्री.बापूराव काळे यांनी ठोस प्रहार न्युज च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
पारधी समाज्यातील लोकं हे रोजंदारीवर कामाला जातात.कोण रस्त्याच्या डांबरीकारणावर, कोण शेतातील कामावर तर कोण बांधकामावर बिगारी म्हणून जातोय अशात ह्या सर्व मुजरांचे हातवारचे पोट आहे.ह्यांच्या रोजंदारीवर परिणाम झाला आहे.लॉकडाउनमुळे पारधी समाज्यातील बहुतेक लोक बेरोजगार झाले आहेत.राज्यशासनाने पारधीसमाज्यावर विशेषतः लक्ष्य देऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ देऊ नये अशी आशा व्यक्त केली आहे.
पारधीसमाज्यामध्ये कुटुंबव्यवस्था मोठी आहे.काहींचे रोजगार बुडाले आहेत तर काही लोक हे भूमिहीन आहेत.राज्यशासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत स्तरातील सर्व पदाधिकारी ह्यांना सूचना देऊन ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहेत व ज्यांच्याकडे अजून रेशनकार्ड नाहीत अश्या सर्व लोकांना अन्नधान्यचा पुरवठा करावा असे आव्हान श्री.बापूराव काळे ह्यांनी केले आहे.






