वनारवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी दत्तूभाऊ भेरे यांची बिनविरोध निवड
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी:- दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी दत्तूभाऊ नामदेव भेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निरीक्षक श्रीमती संजीवनी चौधरी यांच्या उपस्थितीत व सरपंच संगीता तानाजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची आज निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी श्री दत्तूभाऊ नामदेव भेरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निरीक्षक संजीवनी चौधरी यांनी उपसरपंच पदी दत्तूभाऊ नामदेव भेरे यांची बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आली. यावेळी या बैठकीसाठी ग्रामपंचायत सदस्य मोनाली विश्वास चव्हाण, वंदना बबन डमाळे, रवींद्र हिरामण गुंबाडे, रत्ना सुखदेव गवारे, बाळू मुरलीधर मिसाळ, हिराबाई मुरलीधर मिसाळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रूजा ठाकरे, नामदेव भेरे, सुकदेव ठाकरे, अंबादास चोथवे, बंडूभाऊ भेरे, राजाराम राऊत, शिवाजी डमाळे, विश्वास चव्हाण, बबन डमाळे, चंद्रकांत ठाकरे, नाना सातपुते, रोशन मोरे, सुखदेव गवारे, पोलीस निरीक्षक अंबादास बैरागी, ग्रामसेवक समाधान शेवाळे, मुख्याध्यापक भाऊसाहेब नांदूरकर सर, विलास जमदाडे सर, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल गांगोडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो:- वनारवाडी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच दत्तूभाऊ भेरे यांचे अभिनंदन करतांना निवडणूक निरीक्षक संजीवनी चौधरी, सरपंच संगीताताई मोरे, बंडूभाऊ भेरे, रूंजा ठाकरे, नामदेव भेरे, शिवाजी डमाळे, राजाराम राऊत आदींसह ग्रामस्थ.






