Amalner

Amalner: बस दुर्घटनेत पितृ छत्र हरपलेल्या-कु.कोमल चौधरीची अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA) उचलली शैक्षणिक जबाबदारी.

अमळनेर बस दुर्घटनेत पितृ छत्र हरपलेल्या-कु.कोमल चौधरीची अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA) उचलली शैक्षणिक जबाबदारी.

एक सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेने (PTA)अमळनेर बस दुर्घटनेत पितृ छत्र हरपलेल्या-कु.कोमल
चौधरीची उचलली शैक्षणिक जबाबदारी.अलीकडेच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत,
बस अपघातात एकूण अंदाजे 13 प्रवासी मृत्युमुखी पडले होते,त्यात अमळनेर
तालुक्यातील 5 लोकांचा समावेशहोता.अमळनेर आगारात वाहक असलेले प्रकाश चौधरी सदरील दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडले होते.
प्रकाश चौधरी यांची कन्या कु. कोमल चौधरी या विद्यार्थिनीची अमळनेर कोचिंग क्लासेस संघटनेने इ.11वी व 12वी ची संपूर्ण शैक्षणिक
जबाबदारी उचललेली आहे, मा.सीमा अहिरे मॅडम उपविभागीय अधिकारी व
उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग,अमळनेर.यांच्या कार्यालयात क्लासेस संघटना अध्यक्ष श्री.भैय्यासाहेब मगर सर यांनी तशी अधिकृत घोषणा केली.
यावेळी मा.सीमा अहिरे मॅडम यांच्या हस्ते कु.कोमल चौधरीला शैक्षणिक साहित्य देण्यात आले.यावेळी कोमलचे पालक(काका)श्री.निलेश चौधरी
तसेच क्लासेस संघटना(PTA)अध्यक्ष- श्री.भैय्यासाहेब मगर, श्री फिजिक्स क्लासेसचे-श्री.महेश बढे सर, सुमन अकाँटन्सी व केमिस्ट्री क्लासेसचे-श्री.चंदुलाल बडगुजर सर, योगीराज Maths क्लासेसचे- श्री.शिरीष डहाळे सर,अर्जुन बायोलॉजी
क्लासेसच्या-सौ.सोनल जोशी मॅडम तसेच एस.टि.महामंडळाचे कर्मचारी- श्री.मनोज पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button