वृत्त संकलन करीत असताना पत्रकाराचा मोबाईल हिसकावला..
रावेर : निंभोरा बु!!ता,रावेर येथील दैनिक साईमतचे पत्रकार संदीप कोळी हे निंभोरा _खिर्डी रस्त्याने येत असताना समोर पोलीस हे काही केसेस करताना दिसले यावेळेस पत्रकार संदीप कोळी यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वराळे यांना कशाबद्दल आपण दंडात्मक कारवाई करत आहोत याबद्दल विचारणा केली असता सदरील प्रकरणाचा आपल्या मोबाईल मध्ये छाया चित्रांकन करीत असताना मद्यधुंद असलेले पोलीस कॉन्स्टेबल राकेश वराळे यांना या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी पत्रकार संदीप कोळी यांचा मोबाईल हिसकावून घेतला तुला पोलिसी खाक्या दाखवू का व तुझ्यावर गुन्हा दाखल करून तुला आत टाकू का अशा स्वरूपाचे अरे वेरे ची भाषा केली तरी वरील पोलीस हे नेहमी अनधिकृत बिना मास्क घालून स्वतः फिरतात व लोकांवर कारवाई करतात या गोष्टीचा मी पत्रकार संदीप कोळी जाब विचारला असताना मोबाईल फोन लावला तुझ्याकन जे होईल ते तू करू शकतो सर्व सदरील प्रकार हा पत्रकार बांधवांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे समोर मिटवला मोबाईल परत मिळवला तरी अशा पोलीस अधिकाऱ्यांचा वचक आहे किंवा नाही असे जन सामान्यातून बोलले जात आहे अन अधिकृतपणे या पोलीस कारवाई करण्याचा व निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील पत्रकार बांधवांची आहे संदीप कोळी आशिष बोरसे ,राजीव बोरसे, दिलीप सोनवणे ,राजू कोळी, सूनील कोंडे ,प्रमोद कोंडे, काशिनाथ शेंलोळे, भीमराव कोचुरे, स्वप्नील सोनार ,किरण सपकाळे, यांनी त्या पोलीस कॉस्टेबल वरती निलंबनाची मागणी पत्रकार बांधवांकडून होत आहे.






