Nandurbar

कोरोना लसीकरण करून घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन

कोरोना लसीकरण करून घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन

फहीम शेख नंदुरबार

नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेतली. आरोग्य कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आणि अधिसेविका निलीमा वळवी यांनी लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झाल्याने लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते उपस्थित होते.
—-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button