Bollywood

हया चित्रपटाला बनवायला लागली 23 वर्षे..!आणि नोंद झाली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये…!

हया चित्रपटाला बनवायला लागली 23 वर्षे..!आणि नोंद झाली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये…!

मुंबई बॉलिवूड मध्ये शेकडो चित्रपट बनतात.पण हे चित्रपट बनविण्यासाठी प्रचंड मेहनत आणि पूर्वतयारी आवश्यक असते. चित्रपटाचं कथानक, मग लेखन.. त्यानंतर योग्य कलाकारांचा शोध, त्यांच्या तारखा सांभाळून केलेलं शूटिंग, त्यानंतर मग बाकीच्या तांत्रिक गोष्टी.. डबिंग, एडिटिंग आणि बरंच काही.. एवढं सगळं झाल्यानंतर मग चित्रपट तयार होतो.

बॉलीवूडला तब्बल ११० वर्षांचा इतिहास आहे. मदर इंडियापासून अगदी बाहुबली पर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट बॉलीवूडने तयार केले आणि या चित्रपटांनी नवनवीन रेकॉर्ड बनवले, चौकटी मोडल्या.प्रसिद्ध चित्रपटा बद्दल सर्वच बोलतात पण आज अश्या एका चित्रपटाची माहिती घेऊ या ज्याने हे सगळे रेकॉर्ड तर मोडलेच पण हा चित्रपट तयार होण्यासाठी १-२ नाही तर तब्बल २३ वर्ष लागली होती.
१९८६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव होतं, लव्ह अँड गॉड. या चित्रपटात लैला आणि मजनूची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. अभिनेत्री निम्मी आणि लैलाची भूमिका, तर संजीव कुमार यांनी मजनूची भूमिका साकारली होती.
के.असिफ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वतःचं नाव नोंदवलं. आता प्रश्न हा की एवढी २३ वर्ष या चित्रपटाला का लागली?
त्याचं झालं असं, की १९६३ साली या चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं, त्यावेळी या चित्रपटात अभिनेते गुरुदत्त मजनूची भूमिका करत होते. पण दुर्दैवाने १९६४ साली त्यांचं निधन झालं. त्यामुळे काही काळ या चित्रपटाचं शूटिंग झालंच नाही, नव्या अभिनेत्याचा शोध सुरु झाला.
१९७० मध्ये संजीव कुमार यांनी मजनूची भूमिका करायला घेतली, पण त्यानंतर के.असिफ यांची तब्येत खालावली आणि १९७१ मध्ये त्यांचं निधन झालं. यानंतर हा चित्रपट होणारच नाही असं सगळ्यांना वाटत होतं, कारण केवळ १० टक्के शूटिंग झालं होतं, पण के.असिफ यांच्या पत्नी अख्तर असिफ यांनी १५ वर्षांनी के.सी. बारोडिया यांच्या मदतीने पुन्हा एकदा चित्रपटाचं शूटिंग करायला सुरुवात केली.
काही महिन्यातच या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आणि २७ मे १९८६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला, मात्र या चित्रपटातील अनेक कलाकार तेव्हा हयात नव्हते.
या चित्रपटाचं संगीत नौशाद अली यांनी केलं होतं, तर रफीसाहेब, लतादीदी, आशा भोसले अशा दिग्गज संगीतकारांचे आवाज या चित्रपटाला लाभले होते.
असं म्हणतात, की कधी कधी संकटांची मालिकाच सुरु होते, एक संपलं की दुसरं.. दुसरं संपलं की तिसरं.. काही ना काही विघ्न येतंच राहतात, या चित्रपटाच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं, मात्र चिकाटीने हा चित्रपट पूर्ण करण्यात आला आणि आज गिनीज बुकमध्ये या चित्रपटाची नोंद आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button