Amalner

अमळनेर नगर परिषदे अंतर्गत शहरी नागरी आरोग्य अभियान योजने अंतर्गत २७ पदांसाठी आशा स्वयंसेविका नेमणूक पत्र

अमळनेर नगर परिषदे अंतर्गत शहरी नागरी आरोग्य अभियान योजने अंतर्गत २७ पदांसाठी आशा स्वयंसेविका नेमणूक पत्र

रजनीकांत पाटील

( अमळनेर ) येथिल अमळनेर नगर परिषदे अंतर्गत शहरी नागरी आरोग्य अभियान योजने अंतर्गत अमळनेर शहरासाठी आशा स्वयंसेविकांची एकूण ३८ पदे मंजूर होवून पैकी ११ पदावर विद्यमान स्थितीत आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत, उर्वरित २७ रिक्त पदासाठी शासन धोरणानुसार अमळनेर नगर परिषद व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त निवड समिती मार्फत नियमानुसार अर्ज मागवून व छाननी करून २७ पात्र आशा स्वयंसेविका उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली.

कोरोना च्या महामारी मुळे महिला, गरोदर स्त्रिया व लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने हे २७ रिक्त पदे त्वरित भरण्याबाबतचे धोरण लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील यांनी घेतल्यामुळे यापुढे अमळनेर नगर परिषद आरोग्य विभागाला नवनियुक्त आशा स्वयंसेविका ची मोठी मदत होणार आहे. कोरोना ची परिस्थिती पाहता सुरक्षित अंतर राखत निवड झालेल्या आशा स्वयंसेविकांना मा. आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, नगर परिषद वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, प्रशासन अधिकारी श्री. संजय चौधरी, माजी नगरसेवक श्री. विक्रांत भास्करराव पाटील, बाळू कोठारी, आरोग्य सेविका योगित कुलकर्णी आदीसह मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button