Amalner

शिरूड परिसरातील अवकाळीने झोडपले दादर,गहू,हरबरा, सह पिके केली जमीनदोस्त पंचनामा करण्याची मागणी

शिरूड परिसरातील अवकाळीने झोडपले दादर,गहू,हरबरा, सह पिके केली जमीनदोस्त पंचनामा करण्याची मागणी

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : शिरूड भागात झालेल्या बेमोसमी वादळी,वारासह पावसाने गहू, दादर, हरभरा इत्यादि पिके जमीनदोस्त केली आहेत. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे त्यात दादर,गहू, हरभ-यासह प्रचंड नुकसान झाले आहे.
रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतक-याचे कंबरडे मोडले गेले आहे. आधीच ‘कोरोना’ मुळे शेतीचे शेतकरी खचला असताना आता निसर्गानेही आपले रौद्ररुप दाखविल्याने शेतक-यांचा चिंता वाढल्या आहेत.
शिरूड सह अमळनेर तालुक्यातील काही या भागात वादळ होते. ऐन मोसम वर असलेल्या दादर ,गहू व हरभ-याचा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.
या बाबत झालेल्या नुकसानाचे तात्काळ पाहाणी करून पंचनामा करावा अशी मागणी शिरूड येथील शेतकऱ्यांनकडून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button