Chimur

सोनेगाव बेगडे जंगलात मोहादारु भट्टी वर चिमुर पोलीसांची धाड 8 लाख 22000 रु.ची मोहादारु सडवा व साहित्य जप्त

सोनेगाव बेगडे जंगलात मोहादारु भट्टी वर चिमुर पोलीसांची धाड 8 लाख 22000 रु.ची मोहादारु सडवा व साहित्य जप्त

चिमूर प्रतिनिधी–चीमुर पोली स स्टेशनमध्ये ठाणेदार म्हणून स्वप्नील धुळे रुजू झाल्यापासून अवैध दारु भट्यावर छापेमारी धाडी टाकून अवैध दारु विक्रेत्यांना चांगलेच जेरीस आणले आहे अशातच आज
दि. 29/05/2020 रोजी सोनेगाव बेगडे जंगल परिसरात हातभट्टी मोहदारू चा साठा मोठया प्रमाणात असल्याची माहिती पोनी स्वप्नील धुळे पोलीस स्टेशन चिमूर यांना मिळाल्याने त्यांनी आपल्या स्टॉपसह व होमगार्ड याना सोबत घेऊन सोनेगाव बेगडे चा जंगल परिसर पूर्णपणे पिंजून काढला व नाल्याचे भागात दोन ठिकाणी हातभट्टी मोहादारूचा मोठया प्रमाणात दारु साठा मोहादारु चा सडवा व त्यातील साहित्य असा एकूण 8,22,000 रु. साठा जप्त करण्यात यश मिळविले यातील दोन आरोपीवर कारवाही करण्यात आली.
सदरची कारवाही ठाणेदार स्वप्नील धुळे यांचे सोबत पोहवा विलास सोनूले, विलास निमगडे , नाईक पोलीस शिपाई किशोर बोढे, पोलीस काँन्स्टेबल सचिन गजभिये , विनायक सरकुंडे, सतीश झिलपे, भरत गोडवे,शैलेश मडावी, शंकर बोरसरे , शरीफ शेख , होमगार्ड राजू कामडी, प्रमोद बनकर, राजू चौधरी, रवी गायकवाड, अतुल नागपुरे, कवडू दिघोरे यांनी पार पाडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button