Faizpur: धनाजी नाना महाविद्यालयात एनएसएस तर्फे दिवाळी माझ्या भारतासोबत या अभिनय उपक्रमाची सुरुवात
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने *दिवाली विथ माय भारत*( दिवाळी माझ्या भारतासोबत) या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. दिनांक 27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2024 दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने निर्देशित उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा व यातायात व्यवस्थापन, सेवा एक संस्कार उपक्रम यासोबत दिवाळीचा खरा आनंद घेतांना देशाला मजबूत करण्यासाठी फटाके मुक्त दिवाळी, प्रदूषणमुक्त वातावरण यासहित देशाच्या उत्थानासाठी युवकांनी भरीव योगदान देण्याच्या उद्देशाने वरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत
आज दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला धनाजी नाना महाविद्यालयातील एनएसएसच्या स्वयंसेवकांनी फटाके मुक्त दिवाळी, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्त परिसर करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्याचा संकल्प केला. प्रसंगी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रा. डॉ. आर बी वाघुळदे, एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ सतीश दत्तात्रय पाटील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. विकास वाघुळदे, प्रा. डी.बी. तायडे व एनएसएसचे स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
याप्रसंगी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र बी वाघुळदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत असल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांचे अभिनंदन करीत समाज व देश बलिदानासाठी प्रत्येकाचे उत्तरदायित्व असून प्रत्येकाने समाजभान व स्व जबाबदारी ओळखली तर सशक्त भारत म्हणून विश्वपटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळात चे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभत आहे.






