Latur

स्व. महेंन्द्र कुमार चांडक यांच्या स्मरणार्थ आधार फौंडेशन मुरुडच्या वतीने मुरुड मध्ये ८१ जणांनी केले रक्तदान

स्व. महेंन्द्र कुमार चांडक यांच्या स्मरणार्थ आधार फौंडेशन मुरुडच्या वतीने मुरुड मध्ये ८१ जणांनी केले रक्तदान

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-
दि. ०३ / ०६/२०२० वार बुधवार रोजी स्व.महेंद्र कुमार चांडक यांच्या स्मरणार्थ आधार फौंडेशनच्या वतीने मुरुड येते घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ८१ रक्तदात्याने रक्तदान केले .जगभर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन पाळला जात आहे. कोरोना पासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लातुर जिल्ह्यातील मुरूड गावचे नागरिक या परिस्थितीत आपली स्वतःची काळजी घेऊन सर्वाना मदत करत आहेत. कोविड -१९ पार्श्वभूमीवर राज्याच्या रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाला आहे. फौंडेशनच्या वतीने ३ जून वार बुधवार २०२० रोजी सकाळी दहा वाजता मुरूडेश्वर मंदिर मुरूड येथे आयोजित केले होते. यावेळी सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंग) आणि स्वच्छतेच्या सर्व नियमाचे पालन करून रक्तदान करण्यात आले.
या शिबिरास दिलीप दादा नाडे, हणमंत बापू नागटिळक,बी. एन. डोंगरे, अभयसिंह दिलीपराव नाडे , आकाश कणसे ,अंकुश नाडे , दीपक पटाडे , अनंत कणसे , वैभव सापसोड , अमर मोरे , गोविंद घुटे ,महेश कणसे, शुभम चांडक, प्रविण बुबने, ऋषिकेश कोकाटे, शुभम माळी, अजित खोडसे, सद्दाम शेख, विशाल कणसे , ज्ञानेश्वर नाडे , वीरनाथ स्वामी , पंकज पांगळ , अभिजित पटाडे, गुरु स्वामी, नितिन मारोठी, अक्षय पटाडे, गणेश राऊत,अमोल नाडे, महेश गायकवाड,गोकूळ चांडक, प्रशांत वायाळ, प्रनित जोशी, अभिजित पानखडे, रवी हवालदार,आकाश पटाडे, डॉ सुमित भोरकर, डॉ अमित भोरकर, सोमनाथ भोरकर, अजिंक्य धाकतोडे, इत्यादीनी हे शिबीर व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button