Nashik

हिरामण महाराज मोंढे यांचीनाशिक जिल्हा सदस्यपदी निवड.

हिरामण महाराज मोंढे यांचीनाशिक जिल्हा सदस्यपदी निवड.

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-:वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा सदस्यपदी हभपश्री हिरामण दगडु मोंढे देवरगांवकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. वै.हभप दगडु बुवा देवरगांवकर (गायणाचार्य )ज्यांनी वै.हभप.जगन्नाथ महाराज पवार यांचे सान्निध्यात आयुष्यभर निष्काम सेवेचा परमार्थ केला त्यांचे हभपश्री.हिरामण बुवा सुपुत्र आहेत. कोकण परिसरात वारकरी संप्रदाय कार्यक्रमास ते नेहमी सेवाभावाने सक्रिय असतात,त्यांचे निवडीचे देवरगांव पंचक्रोशीत स्वागत होत आहे.भावी वाटचालीस त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा. वारकरी महामंडळातर्फे पदनियुक्ती प्रत्येक भागातील जिल्हाभर राबविण्याचा प्रयत्न जिल्हा कमिटी व तालुका कमिटी करत आहेत,लवकरच राज्य कमिटीचे मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हाभरातील नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम नियोजीत करण्याचा मानस मार्गदर्शन कमिटीचा आहे असे प्रमुख मार्गदर्शक हभपश्री. श्रावण महाराज आहिरे यांनी सांगीतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button