Shirdi

राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार यांनी शिर्डी संस्थानला १०० लीटर सॅनिटायझर दिले

राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार यांनी शिर्डी संस्थानला १०० लीटर सॅनिटायझर दिले

शिर्डी राहुल फुंदे

राज्यभरात आमदार रोहितदादा पवार हे सर्व जिल्ह्याना त्यांच्या बारामती ॲग्रो मार्फत मोफत सॅनिटायझरचे वाटप करत आहेत त्यानुसार अहमदनगर जिल्ह्याला देखील ६०० लीटर सॅनीटायझर काल दादानी पाठवले.

काल सहज राज्यभरातील कार्यकर्त्याना दादा फोन करत असताना मला दादांचा फोन आला आणि त्यावेळी मी दादाना शिर्डीसाठी सुद्धा सॅनीटायझर पाठवावे अशी विनंती केली.

तर आज दुपारी १ वाजता दादांचा मला परत कॉल आला आणि शिर्डी संस्थान ला १०० लीटर सॅनीटायझर पाठवले आहे ते ताब्यात द्या असे सांगितले.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ते सॅनीटायझर पोहचवले.
त्यावेळी माझ्यासोबत वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, संस्थानचे पि.आय.गाढे साहेब, पी.आर.ओ यादव, युवकचे शहराध्यक्ष विशाल भडांगे, साई ९ समुहाचे साईराज गायकवाड उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button