Akkalkot

राजीव नगर झोपडपट्टी अक्कलकोट शहर येथे समाज मंदिर बांधणे बाबत

राजीव नगर झोपडपट्टी अक्कलकोट शहर येथे समाज मंदिर बांधणे बाबत

कृष्णा यादव

अक्कलकोट रिपाई आठवले गट यांच्या वतीने अक्कलकोटचे मुख्याधिकारी आशा राऊत यांना समाज मंदिर मागणीचे निवेदन सादर गेल्या 80-90 वर्षापासून राजीव नगर झोपडपट्टी येथे दलित बांधव या ठिकाणी कायमचे रहिवासी आहेत आज पर्यंत येथे एकही सुधारणा झालेली नाही त्या ठिकाणी मोठ्य प्रमाणत दलीत बांधव राहतात. त्याना तेथे सांस्कृतिक सामाजिक समाज मंदिर व इतर काही कार्यक्रम घेण्यासाठी आतापर्यंत समाज मंदिर झालेली नाही ‌त्या लोकांसाठी कूठलीही सुखसुविधा एकत्रित बसुन विचारविनिमय करण्यासाठी स्वातंत्र्याच्या कालावधी नंतर सुद्धा त्यांना समाज मंदिर उपलब्ध झालेली नाही .यापुर्वी ही 2013 साली तक्तालीन मुख्य अधिकारी यांना या यासंदर्भात निवेदन दलित बांधव नगरपरिषद कडे सादर केलेले होता, ‌तरीही आतापर्यंत कोणतही या विषयाचे दखल घेतली गेलेली नाही. तरी आपण दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत किंवा नगरपरिषद बोर्ड मीटिंग मध्ये सदर विषय मंजूर करून मार्गी लावण्यात यावे राजीव नगर झोपडपट्टी (बुद्ध वस्ती ) येथे समाजमंदिर बांधुन मिळावी व त्यासाठी पन्नास बाय पन्नास नगरपरिषदची जागा उपलब्ध असुन त्या ठिकाणी समाज मंदिर लवकरात लवकर बांधुन मिळावे यासाठी अक्कलकोट नगरपरिषद चे मुख्याधिकारी आशा राऊत यांना निवेदन देण्यात आले यावेळी यावेळी निवेदन देताना आर पी आयचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, प्रा.राहुल रूही, शुभम मडीखांबे , अंबादास शिंगे, सुरेश सोनकांबळे,सजंय शिंदे, बसु शिंगे ,रवी, सोनकांबळे, गैरिशंकर माशाळे, सुभाष गायकवाड, सुर्यकांत लोखंडे आदी.उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button