फैजपूर येथे अलफलाह गृप तर्फे पत्रकारांचा सत्कार
फैजपूर प्रतिनिधी: सलीम पिंजारी
पत्रकार दिनाचे औचित्य साधून अलफलाह गृप फैजपूर तर्फे परिसरातील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी किशोर चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक रविंद्र होले, नगरसेवक हेमराज चौधरी, देवेंद्र बेंडाळे,कुर्बान मेंबर, देवेंद्र साळी इ.होते.याप्रसंगी शेख अहसान कुरेशी, अध्यक्ष अलफलाह गृप व लोणार सरोवर अपंग विकास सेवाभावी असोसिएशन तालुका अध्यक्ष यांच्यासह शाहरुख कुरेशी, इरफान पेंटर,कलंदर अली यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
यावेळी फैजपूर परिसरातील पत्रकार सर्वश्री अरुण होले, उमाकांत पाटील, योगेश सोनवणे,ललित फिरके, फारुख शेख, संजय सराफ,नंदु अग्रवाल,शाकीर मलिक,समीर तडवी,सलीम पिंजारी,राजू तडवी, रियाज भाई,मुदस्सर नजर,कामील शेख,जाविद काजी, देवेंद्र झोपे, इ.उपस्थीत होते.सुत्रसंचालन गणेश गुरव सर तर आभार प्रदर्शन अहसान कुरेशी यांनी केले.






