तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत बक्षीस वितरण
लातुर प्रतिनिधी:-प्रशांत दिलीप नेटके
औसा:- तालुक्यातील तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळेत विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य महेश पाटील,प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी कवठाळे,व्यंकट बिराजदार, पद्माकर तौर, बालाजी यादव, संगमेश्वर कुंभार, बीबीशन गरड, जयराज पाटील, सचिन गरड, नितीन कवठाळे, राहुल घुळे, जगदीश पाटील, संतोष बिराजदार हे होते.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या नवयुवकांतर्फे एकूण ३८० बक्षिस वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोहनराव मोरे, सहशिक्षक धर्मराज भिसे, विलास चव्हाण, अशोकराव पवार(क्रीडाशिक्षक) तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.