सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अभिजीत पाटील यांची निवड
प्रतिनिधी रफीक आत्तार
सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर कपंन्याचे डिलर असोसिएशनची आज बार्शी येथे मिटींग पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिलरच्या वतीने अध्यक्ष अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली.
कोरोनाच्या संकट देशासह महाराष्ट्रात असल्याने आर्थिक संकटात सपडलेल्या सर्व डिलरच्या अडीआडचणीचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. तसेच आरटीओ च्या नियमाचे पालन करून ट्रॅक्टर विक्री करण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याचा हेतू असेल, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल माझा शेतकरी समृद्ध होईल याचा विचार केला जाईल असे अभिजीत पाटील म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष किरण रणशिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे, सचिव शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली.






