Nashik

2020चे सरते शेवटी गोंडेगाव ग्रामपंचयात निवडणूक बिनविरोध ची परंपरा कायम

2020चे सरते शेवटी गोंडेगाव ग्रामपंचयात निवडणूक बिनविरोध ची परंपरा कायम

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील विविध पुरस्कारांसह नुकताच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या गोंडेगाव ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली
जिप सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली गोंडेगाव ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध हो ऊणं सहा जागांसाठी सहाच अर्ज दाखल करण्यात आले. त्यावेळी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनिल जाधव,पंडित भवर,अमर गोसावी,बाबुराव नाठे,छगन गोसावी,माधव गोसावी,मोतीराम भवर,रजाक पठाण,त्र्यंबक जाधव,अशोक जाधव,सुनील दवंगे,उत्तम गायकवाड,प्रकाश गांगुर्डे,संजय नाठे,भास्कर नाठे ,गोकुळ गांगुर्डे,रामभाऊ जाधव,दत्तात्रेय भवर इतरांनी परिश्रम घेतले.
बिनविरोध निवड होणार असलेले सदस्य पुढीलप्रमाणे
वॉर्ड क्र.1 अनिल वसंत भगरे,पल्लवी भास्कर भगरे,सुशीला मोतीराम भवर,वॉर्ड क्र.2 लक्ष्मी भास्कर भगरे
वॉर्ड क्र.3 अजय गणपत गांगुर्डे,शमीम जावेद पठाण.
विद्यमान सरपंच लक्ष्मी भगरे या गेली 13 वर्ष सलग सरपंच आहेत त्यांचे कार्यकाळात ग्रामपंचायतीने विविध विकासकामे केले असून गावास विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे.त्यात
निर्मल ग्राम हा राष्ट्रीय पुरस्कार,पर्यावरण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार नुकताच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.बिनविरोध निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीराम शेटे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

फोटो- गोंडेगाव ग्रामपंचयात निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सदस्यांचा सत्कार करतांना ग्रामस्थ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button