ErandolMaharashtra

एरंडोल जवळ अपघातात तिन जखमी. एक तास वाहतुकीचा खोळंबा.

एरंडोल जवळ अपघातात तिन जखमी.
एक तास वाहतुकीचा खोळंबा.

विक्की खोकरे

प्रतिनिधी – एरंडोल जवळुन तिन किलोमीटरवर असलेल्या हॉटेल शिवानंद धाब्याजवळ ट्रक व पियाजो च्या अपघातात तिन जन जखमी झाले.या अपघातामुळे जवळपास दीड तास वाहतुक ठप्प झाली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे आज दि.१५ मार्च रविवार रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास धुळ्याकडून जळगाव कडे स्टील चे डबे घेऊन जाणार ट्रक क्र. एम.एच.04 एफ.डी.7317 व जळगाव कडुन एरंडोल कडे येणारी पियाजो क्र. एम.एच.19 – बी.एम.3152 या दोघांमध्ये झालेल्या अपघातात ट्रक हा पुलावर पलटी झाल्याने जवळपास दीड तास वाहतुक ठप्प होती.त्यामुळे घटना स्थळाच्या दोन्ही बाजूला दोन ते अडीच किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दरम्यान पोलिसांनी वाहतुक धरणगाव व म्हसावद मार्गे वळविण्यात आली होती.अपघातात तिन ड्रायव्हर व क्लिनर सह तिन लोकं जखमी झाले असुन कुठलीही जीवित हानी झाली नाही.

एरंडोल जवळ अपघातात तिन जखमी. एक तास वाहतुकीचा खोळंबा.

यावेळी राष्ट्रीय महामार्गावर काम करणारे पोकलंडचे चालक शब्बीर शेख च्या सहाय्याने ट्रक रस्त्यावरून उचलुन वाहतुक सुरळीत करण्यात आली.यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक स्वप्निल उनवणे,सह पोलीस कर्मचारी मनोज पाटील,जुबेर खाटीक, सुभाष धाबे,संदीप सातपुते,राहुल बैसाणे,अनिल पाटील व महामार्ग वाहतुक पथकाचे पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार मनोरे,पी.एम.काझी,पी.एन.काळे,पवन देशमुख,पी.एन.बारी,दिपक पाटील,चंद्रकांत सोनवणे,नितीन सफकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ मदत करुन वाहतुक सुरळीत करण्यास व जखमींना दवाखान्यात पोहचविण्यास मदत केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button